दिपप्रज्वलन करून केले. तर अध्यक्षस्थानी आशापुरी देवी पंच मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जगदीश मराठे हे होते. ह्यावेळी प्रमुख उपस्थिती सी.एस.खर्डे विस्तार अधिकारी, सी.जी.बोरसे गटसमन्वयक, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.ए.कदम, उपाध्यक्ष जी.डी.बोरसे ( आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक), तालुका क्रीडा विभागाचे अध्यक्ष एस.एस.भदाणे, सचिव अनिल देसले,पंच मंडळ संचालक बाबुलाल पुना सोनवणे, प्रशांत जगदीश मराठे, मुख्याध्यापक ए.टी.पटेल, माजी मुख्याध्यापक के.एस.पवार , ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आबासाहेब खांडेकर, जी.जी.भामरे आदी सह तालुक्यातील क्रिडा शिक्षक उपस्थित होते. सुरुवातीला प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.टी.पटेल केले. सरस्वती माता व आई कुलस्वामिनी आदिशक्ती आशापुरी माता आणि कै केशव मराठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ. सी.के.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कोरोणा महामारीच्या खंडानंतर प्रथमच शालेय स्पर्धांना प्रारंभ झाला असून हयाच विद्यालयात कुस्ती व कबड्डी मुला मुलींच्या बालगट, शालेय गटातील होणार आहेत. उद्घाटिय सामना ललवाणी विद्यालय बेटावद व आईसाहेब सकुबादेवी विदयालय दिवी यांच्यात झाला. ह्या सामण्यातील खेडाळुंचा परिचय मान्यवरांनी करून संघाला शुभेच्छा दिल्या. शालेय कबड्डी हा खेळ सर्व अंगांनी मेहनतीचा असुन आरोग्यदायी आहे. संघभावना ठेवून नैसर्गिक खेडाळु वृत्ती जोपासली जावी असे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. सुत्रसंचलन शिक्षक पंकज पवार यांनी केले.सदर स्पर्धा साठी पंच मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जगदीश मराठे सह संचालक यांचे विशेष योगदान लाभत आहे. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा पदाधिकारी व क्रीडा शिक्षक तसेच श्री आशापुरी देवी विद्यालय पाटण येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


0 Comments