नवी दिल्ली : दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंडा याचा पाकिस्तानात कथितरित्या ड्रग्जच्या अतिसेवनानं मृत्यू झाला आहे.
पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया आणि टार्गेट किलींगमागं त्याचा हात होता.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि केंद्रीय यंत्रणांनी त्याच्या मृत्यूच्या दुजोरा दिला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी वढेरा सिंग याच्यापासून हरविंदर सिंह उर्फ रिंडा वेगळा झाला होता.
हरविंदर सिंह उर्फ रिंडा याला लाहोरच्या जिंदाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
मे महिन्यात पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टर माईंड होता.
दहशतवादी, गँगस्टर, ड्रग्जची तस्करी करणे, शस्त्रांचा पुरवठा इत्यादी प्रकरणी रिंडाविरोधात पंजाब पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
एन.आय.ए.नं हरविदंरसिंह उर्फ रिंडा याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
पंजाबमधील खलिस्तानी चळवळीचा तो चेहरा बनल्याचा दावा एन.आय.ए.नं केला होता. एन.आय.ए.सोबत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालचे पोलीस रिंडाच्या शोधात होते.
पाकिस्तानातून भारतात शस्त्र आणि ड्रग्जची तस्करीच्या कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.
*हरविंदर सिंह उर्फ रिंडा कोण*?
हरविंदर सिंह उर्फ रिंडा हा पंजाबच्या तरंतरन जिल्ह्यातील होता.
हरविंदर लहानपणी कुटुंबासह महाराष्ट्रातील नांदेडमध्ये वास्तव्यासाठी आला होता. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार हरविंदर सिंहनं वयाच्या १८ व्या वर्षी पंजाबमध्ये एका नातेवाईकाचा खून केला होता.
नांदेडमध्ये त्यानं स्थानिक व्यापाऱ्यांकडून वसुली सुरु केली होती आणि दोन लोकांचा खून केला होता.
आता तो पाकिस्तानात असल्याची माहिती समोर आली होती.
८ नोव्हेंबर २०२१ ला नवांशहर सी.आय.आय.च्या इमारतीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात होता.
0 Comments