Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यात केसरी कार्डधारकांची शोध मोहीम, यासाठी पोलीस पाटलांनी पुढाकार घ्यावा तहसीलदार -आशा गांगुर्डे*



 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --
शिंदखेडा येथे,तहसील कार्यालयात तहसीलदार आशा गांगुर्डे  यांच्या उपस्थिती व पुरवठा अधिकारी हर्षा दुधे, यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांची बैठक संपन्न झाली यावेळी तालुक्यातील  पोलीस पाटील व भगिनी उपस्थित होते
शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्या नागरिकांकडे केसरी कार्ड आहे व त्यांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळत नसेल अशा  केशरी शिधापत्रिकाधारकाला रेशन दुकानातून धान्य मिळावे यासाठी रेशन कार्डची झेरॉक्स व रेशन कार्ड आतील ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या व्यक्तींची आधार कार्डांची झेरॉक्स व हमीपत्र भरून गावातील पोलीस पाटलांनी सदर गावातील केसरी कार्डधारकांना लाभ न मिळणाऱ्या ची शोध मोहीम घेऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब प्रमुखांचे हमी पत्र भरून,तसेच केसरी कार्डधारक याना,या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करून पोलीस पाटलांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले. यावेळी पोलीस पाटलांनी केलेल्या कामगिरीमुळे समाधान व्यक्त केले तसेच पोलीस पाटलांनी, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी, तसेच गावातील अवैद्य,गौण खनिज वाळू, वाहतूक करीत असेल त्यांची माहिती ताबडतोब महसूल विभागाला देऊन शासकीय कामाला मदत करावी असे आवाहन तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी केले, यावेळी पुरवठा अधिकारी दुधे  यांनी, केसरी कार्डधारक तसेच जीर्ण झालेले कार्ड, नवीन कार्ड तयार करण्यासाठी, कुठली कागदपत्र व कसा लाभ घेता येईल याची माहिती दिली यावेळी  तालुक्यातील पोलीस पाटील  शिवाजी पाटील, महेंद्र पाटील,भाऊ परदेशी, चरण सिंग गिरासे,  भूषण पाटील, छोटू पाटील,,युवराज माळी, जयश्री पाटील ,अनिता पाटील ,अर्चना पाटील  बहुसंख्य पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments