शिंदखेडा – शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली असून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कलावतीताई सुकलाल माळी यांनी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांचा तब्बल ७९१ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह शिंदखेडा शहरात राकेश माळी यांनी राजकीय इतिहास रचल्याची चर्चा आहे.नगरसेवक पदांच्या निकालात भाजपला सर्वाधिक यश मिळाले असून भाजपने एकूण ११ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ जागांवर, काँग्रेस १ जागेवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ जागेवर विजयी झाली आहे.
प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे –
प्रभाग १ : सकट ज्ञानेश्वर बबन – भाजपा
प्रभाग २ : सोनवणे शितल गुलाब – भाजपा
प्रभाग ३ : पाटोळे कमलबाई रवींद्र – काँग्रेस
प्रभाग ४ : कुरेशी आरेफबी अबूतालीम – भाजपा
प्रभाग ५ : राजपूत अश्विनी संदीप – भाजपा
प्रभाग ६ : देसले सुनिता अरुण – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
प्रभाग ७ : देसले उदय अरुण – भाजपा
प्रभाग ८ : मराठे पूनम गोविंद – भाजपा
प्रभाग ९ : देसले दीपक सुधाकर – भाजपा
प्रभाग १० : भदाणे सुयोग जगतराव – भाजपा
प्रभाग ११ : पाटील मनोहर गोरख – भाजपा
प्रभाग १२ : माळी रजूबाई सुभाष – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
प्रभाग १३ : गिरासे वंदना चेतन – भाजपा
प्रभाग १४ : भिल संगीताबाई चंद्रकांत – भाजपा
प्रभाग १५ : माळी कलावतीताई सुकलाल – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग १६ : सोनवणे पुष्पा गोपाळराव – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग १७ : भिल अर्जुन रामसिंग – राष्ट्रवादी काँग्रेस
या निकालामुळे शिंदखेडा नगर पंचायतेत भाजपचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे. निकालानंतर शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
*
* भुषण पवार*
0 Comments