Header Ads Widget

*शिंदखेडयात सत्ता भाजपाचीच पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत**भाजपाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अँन्टीइन्कमबन्सींचा फटका : 17 पैकी 11 जागांवर भाजपा*


शिंदखेडा – दोंडाईचा नगरपालिका बिनविरोध करण्यात मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी अधिक वेळ खर्च केल्याचा तसेच शिंदखेडा नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांविरोधात असलेल्या अँन्टीइन्कमबन्ंसीचा फटका भाजपाला बसला असून नगरपंचायतीत सत्ता भाजपाची आली असली तरी मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र पराभूत झाला आहे, एकुण 17 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडुन आले असून राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे 4, कॉग्रेस 1 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 नगरसेवक निवडुन आला आहे

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा  नगरपंचायतिची निवडणुक लागली होती त्यात मंत्री जयकुमारभाऊ रावल यांनी आपले होम ग्राउंड असलेल्या दोंडाईचा नगरपालिकेत नगराध्यक्षांसह सर्व 26 उमेदवार भाजपाचे बिनविरोध निवडून आणले होते. त्यात त्यांचा जास्त वेळ गेल्याने शिंदखेडा नगरपंचायतीत दुर्लक्ष झाले. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला.

*नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर एंटीइनकंबसीचा फटका* 
 निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर मोठ्या प्रमाणावर एंटीइनकंबसी असल्याचे दिसत होते. ते आजच्या निकालात स्पष्ट झाले भाजपचे १७ पैकी ११ जागा निवडून येत नगरपालिकेत सत्ता भाजपने मिळवली मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र पराभूत झाला.

*जातीय समीकरणाचाही परिणाम*
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत जातीय समीकरणचा मोठा परिणाम दिसून आला त्यात भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अत्यंत अल्पमते असलेल्या सोनार समाजाचा होता तर राष्ट्रवादीच्या उमेदवार हे शिंदखेड्यात बहुसंख्य असलेल्या माळी समाजाचे असल्याने भाजपच्या ११ जागा आल्या अन नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला आणि राष्ट्रवादीच्या केवळ ४ जागा आल्या मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र निवडून आला.

Post a Comment

0 Comments