Header Ads Widget

*मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा महाराष्ट्र राज्य ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आहे.:चेअरमन बाबुराव बोत्रे*.सातपुड्यातील ओंकार शुगर मिल मधील ऊसतोड कामगारांना ब्लँकेट व साडी वाटप.


शहादा दि.२०(स्व.रा.तो)
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य प्रमुख व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांचा संकल्पनेनुसार  दि.१८ व १९ डिसेंबर २०२५ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील, ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज युनिट ९ मधील ऊसतोड कामगारांना थंडीवाऱ्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी ब्लँकेट व  ऊसतोड कामगार भगिनींना साडी परिवर्धे गाव व परिसरात ऊसतोडीसाठी वास्तव्यास असलेल्या कामगारांना थंडीपासून बचाव व्हावा व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उदात्त हेतूने मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.१८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत थेट शेतात जाऊन ३२२ ऊसतोड कामगारांना ब्लँकेट व साड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
थंडीच्या दिवसांत उघड्यावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांना अनेक आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. श्री. मनीलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवृत्त सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, दैनिक स्वराज्य संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, एवढी संडे रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ. नितील चंदेया, भिवंडी पोलीस पाटील संघाचे मा.अध्यक्ष ॲड.सोमनाथ ठाकरे, परिवर्धा परिसरातील आरोग्य सेवक, राज्यपाल सन्मानित समाजसेवक डॉक्टर किशोर आमोदकर,समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चे चेअरमन९ पुरुषोत्तम नगर, साखर कारखान्याचे चेअरमन श्री.बाबुराव  बोत्रे पाटील यांचा उपस्थितीत जनरल मॅनेजर संजीव गुरव व मिलिंद पटेल, मुख्य शेतकी अधिकारी  श्री.जगन्नाथ जगताप यांनीही या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.गरजू घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून मदत करण्याची भूमिका या ग्रुपची नेहमीच राहिली असून, त्याचाच हा एक भाग असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे  यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील, 
कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सेवानिवृत्त सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे,
स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे संचालक डॉ. श्री. दिनेशभाई ठक्कर,
रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. निखील चंदेरीया,
पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्सचे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे
परिवर्धन परिसरातील आरोग्य सेवक राज्यपाल सन्मानित समाजसेवक डॉक्टर किशोर आमोदकर, सोनवल येथील मनोहर पाटील, तऱ्हाडी,जावदे येथील श्री.महेश पाटील,श्री. गणेश पाटील ,कारखान्याचे शेतकी अधिकारी 
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवसेवेच्या कार्याचे कौतुक करत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप सामाजिक बांधिलकीतून सातत्याने राबवत असलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांनी मांडले.ओंकार शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज युनिट ९ पुरुषोत्तम नगर, साखर कारखान्याचे चेअरमन श्री.बाबुराव  बोत्रे पाटील यांचा उपस्थितीत जनरल मॅनेजर संजीव गुरव व मिलिंद पटेल, मुख्य शेतकी अधिकारी  श्री.जगन्नाथ जगताप, ऊस पुरवठा अधिकारी श्री. पांडुरंग राजपूत, श्री.गणेश चव्हाण, श्री. प्रशांत पाटील,तऱ्हाडी गटाचे फील्ड अधिकारी श्री.संजय शिंपी,यांनी विशेष सहकार्य केले. मुख्य शेतकी अधिकारी श्री.जगन्नाथ जगताप यांनी विशेष आभार व्यक्त केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.*

Post a Comment

0 Comments