*शिंदखेडा (प्रतिनिधी)* धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेवाडे ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाऱ्या *आम्ही नेवाडेकर* पॅनलने विजय संपादित केला आहे. अत्यंत चुरशीच्या लढाईत शिवसेनेतर्फे सरपंच पदासाठी रोहिणी लक्ष्मीकांत साळुंखे यांनी 105 मतांनी विजय संपादित केला.
संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नेवाडे ग्रामपंचायतीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांचे *आम्ही नेवाडेकर* पॅनल व राष्ट्रवादी व भाजप यांचे एकत्रित माजी आमदार श्री.रामकृष्ण पाटील यांचे पॅनल यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होती.
यापूर्वी नेवाडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती. सदर सत्ता टिकवण्यास अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांना यश आले असून त्यांच्या पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांचा पॅनलच्या एक उमेदवार अवघा एक मतांनी पराभूत झाला.
या निवडणुकीत शिवसेनेने सोशल इंजिनिअरिंग करत प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलेले होते. नेवाडे ग्रामपंचायतीच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा कुठल्याही पॅनलला आजपर्यंत यश मिळालेले नव्हते. हा चमत्कार करण्यात शिवसेनेला यश मिळाले असून मागील पंचवार्षिक निवडणुकीत नेवाडे गावात विकास कामांचा झंझावात निर्माण केला होता. त्यामुळे नेवाडेकरांच्या विश्वास संपादन करण्यात शिवसेनेला यश आलेले होते.
*आम्ही नेवाडाकर* पॅनलने विजय संपादन केल्यानंतर गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. गावात गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात उमेदवारांचे स्वागत केले. त्यानंतर विजयी सभा झाली.
यावेळी बोलताना श्री. हेमंत साळुंके म्हणालेत की, नेवाडे गाव माझी भाऊबंदकी असून या गावातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माझ्या प्रामाणिक प्रयत्न असेल. येणारा काळ हा नेवाडेकरांचा उन्नतीचा काळ असून नेवाडे गावाला नंबर वन गाव करण्यासाठी माझ्या प्रयत्न असेन. ज्यांनी-ज्यांनी या निवडणुकीत *आम्ही नेवाडेकर* पॅनलला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त केलेत.
यावेळी श्री.एस.एल. पाटील सर, श्री.मोतीराम साळुंके, श्री.जयवंत साळुंके, सौ.प्रतिभा साळुंके, श्री. लक्ष्मीकांत साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. दौलतराव साळुंके, श्री. निंबा नाना पवार, श्री. काशिनाथ भवरे, श्री. लोटन बागुल, श्री.मुनीर पिंजारी, श्री.भिलु दादा पिंजारी, श्री.मोहन गिरासे, श्री.कांतीलाल साळुंके, श्री. पिरण साळुंके, श्री. संजय साळुंके, श्री.शालिक भिल, श्री.किशोर पवार, श्री.शरद साळुंके, श्री. हिरालाल साळुंके आदी उपस्थित होते व विशेष मेहनत या सगळ्यांनी घेतली.

0 Comments