शिंदखेडा-- (यादवराव सावंत) प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 324 गोशाळांना शासनाने नुकतेच 65 कोटींचे अनुदान मंजूर केले असून यासाठी सातत्याने मागणी करणारे महाराष्ट्र गोशाळा चालक संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांनी शासनाचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र राज्यातील गोशाळांना सरसकट अनुदान मंजूर करून गोशाळेतील कर्मचाऱ्यांना मानधन व वाढीव खावटी खर्च द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य गोशाळा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांनी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.राज्यातील गोवंश व पशुधन जीवंत रहावे, त्यांचे संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोशाळांना देखील सरसकट अनुदान द्यावे, त्याठािकणी काम करणाऱ्या गोसेवकांना मानधन देवून त्यांना प्रेरीत करावे अशी जोरदार मागणी जितेंद्रसिंह राजपूत यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटीतून केली होती.राज्यातील गोशाळा चालकांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या होत्या. राज्यातील जवळपास एक हजार गोशाळांपैकी माजेक्याच गोशाळांना अनुदान देवून इतर गोशाळांवर अन्याय होत आहे, या संदर्भात मागणी करण्यात आली होती. तशा आशयाचे वृत्तही प्रसिध्द करण्यात आले होते.यावर आपण टप्या-टप्याने का होईना परंतू राज्यातील सर्व गोशाळा चालकांना सरसकट अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली हेाती. आणि मागणी मान्य न झाल्यास 1 मे पासून उपोषणाचा इशारा देखील दिला होता. या मागणीचा गांभीर्याने विचार करून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील 324 गोशाळांना 65 कोटी रूपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्र्यांनी गोशाळा चालकांचा प्रश्नावर गांभीर्याने विचार करून तो तातडीने सोडविल्याबद्दल गोशाळा चालक संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत यांनी मंत्री महोदयांचे व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
0 Comments