उडाणे : धुळे जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वृद्धींगत होण्यासाठी वाचनालय सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेत. म्हणून जिल्ह्यातील वाचनालयांच्या इमारतींसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांनी उडाणे येथे आयोजीत कार्यशाळेत केली.
उडाणे येथे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची कार्यशाळा प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे यांनी केले व महाराष्ट्र राज्य कार्यवाह अनिल सोनवणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह रोहिदास हाके यांनी केले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेले श्री संतोष बागुल, गोकुळ देवरे, शिवाजी पाटील, गोरख पाटील, योगेश हालोर, बापुजी हाके, सागर हाके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर संजय पाटील, पी.एम सुर्यवंशी . महेंद्र जाधव . राहूल महिरे .हिम्मतराव पाटील . नरेंद्र पाटिल, प्रमोद महाजन .युवराज बोरसे, मधुकर पाटील, कमलाकर शिंदे, पोपट शिंदे, देविदास हाके, विठ्ठल बागुल, नाना वाघ .रघुनाथ हाळगीर, ताराचंद हाळगीर, रत्नाकर हाके, सरदार हाके, दयाराम शिंदे, संजय शिंदे यांचा सत्कार रोहिदास हाके यांनी केला. या ग्रंथालय संघाच्या कार्यशाळेत ग्रंथालयाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल सोनवणे नाना वाघ .यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथालय चळवळी प्रत्येक माणसा .पर्यंत पोहोचली पाहिजे. असा सूर या कार्यशाळेतून उमटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पाटील व एस के बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार व संयोजन योगेश हालोर व बापूजी हाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर हाके, सदाशिव हाके, जिभाऊ मासुळे, गोकुळ मासुळे, भावेश हाके आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments