Header Ads Widget

*स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उ.बा.ठा.वतीने स्मारक दुरूस्ती साठी निधी संकलन करून भिक मांगो आंदोलन*



धुळे- धुळे शहरात 1983 साली स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य सभेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले, तात्कालिक विधान परिषदचे सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले, आज या स्मारकाची अंत्यत दयनीय अवस्था झाली असून त्या कङे धुळे 



महानगर पालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह महापौरांनी हि दुर्लक्ष केले आहे, एकीकङे शहर विकासासाठी धुळे शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी  धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपाचे खासदार ङाॅ.सुभाष भामरे कोट्यावधींचा निधी आणल्याच्या खोट्या बातम्या आकङे वाढवुन सांगतात, नगरउथ्थान योजनेंतर्गत कोट्या वधींचा निधी खर्च केला जातो पन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या दुरूस्ती साठी पंचवीस तीस लाखांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला नाही, त्याच्या निषेधार्थ शिवसेना महानगर वतीने पंधरा दिवसांपूर्वीच आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला  प्रतिसाद देत शहराच्या आमदारांनी विस लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला, पन तरीही विद्यमान महापौर व उपमहापौर यांच्या प्रभागातील  या स्मारकाच्या दुरूस्ती साठी एक नया पैसाही विद्यमान भाजप  प्रशासनाने दिला नाही, त्याचा निषेध करीत आज विर सावरकरांच्या 141 व्या जयंतीनिमित्त त्यांना शिवसेना महानगर वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येवुन *स्मारक दुरूस्ती निधी संकलन करण्यासाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले*, या प्रसंगी नागरिक व धुळेकरांनी निधी संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील ङाॅ.सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाङे, सुषमा मराठे, नरेंद्र परदेशी  भरत मोरे, गुलाब माळी, देविदास लोणारी, ललित माळी, विनोद जगताप, संदिप सुर्यवंशी, संजय जवराज, आण्णा फुलपगारे, मच्छिंद्र निकम, प्रविण साळवे, कैलास मराठे, पंकज भारस्कर, आनंद जावङेकर, छोटुभाऊ माळी, नाना शिंदे वङजई, महादु गवळी,  प्रकाश शिंदे,संदीप चौधरी, सागर निकम, शत्रुघ्न तावङे, अजय चौधरी, निलेश कांजरेकर, दिनेश पाटील, पिनुभाऊ सुर्यवंशी,  वैभव पाटील, शुभम मतकर,रामदास जगताप, सुरेश चौधरी, संतोष शर्मा, मुकेश भोकरे, लक्ष्मण बोरसे, तेजस सपकाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 




उ.बा.ठा.

Post a Comment

0 Comments