Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र.बे.शिवारातील बांबुची शेती जाळुन खाक - लाखोंचे नुकसान--त्वरित पंचनामा करून भरपाईची मागणी*



                    शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- तालुक्यातील तावखेडा प्र. बे. शिवारातील भालचंद्र भास्कर पाटील या शेतकऱ्यांचे गट नं- 280/3  बांबूची शेती  जाळाली आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे 


नुकसान झाले आहे. ही घटना आज ( दि 25-5-23 ) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झाली असल्याचे समजले. घटनास्थळी गावातील सरपंच, पोलीस पाटील , गावकरी दाखल झाले. एक एकर शेतात बांबू लागवड केली होती. गावकऱ्यांच्या 


मदतीने काही अंशी आग विझविण्यात यश आले.  त्यापैकी अर्धा एकर बांबु पुर्णतः जळुन खाक झाला आहे. ठिबकच्या नळ्या देखील जळाल्याने जवळपास लाखोंचे नुकसान भालचंद्र भास्कर पाटील हया शेतकऱ्यांचे नुकसान झालेले 
असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरी शासन प्रशासनाने दखल घेऊन पंचनामा करण्याची मागणी होत आहे. तशी फिर्याद शिंदखेडा पोलीस स्टेशनला    गुन्हा/ अकस्मात आग नोंद क्र. 10/2023 नोंद केलेली आहे. स्वतः शेतकरी भालचंद्र पाटील यांनी दिली आहे. एका एकरात पाच वर्षापूर्वी लागवड केली होती आता तोडणीच्या मार्गावर असताना हे संकट कोसळल्याने शेतकरी पुर्णतः हतबल झाले आहे. तरी सदर बांबूची शेती अचानक कशी जळाली, जवळपास शेतावरुन कोणतीही वीज पुरवठा करणारी तारा गेली नसल्याने देखील हा कसा झाला हयाचा शोध घेऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments