Header Ads Widget

*शिंदखेडा एस. एस.व्ही.एस. महाविद्यालयाच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम--* *गितेश्वरी पाटील विज्ञान शाखेतून तर अभिजित गिरासे वाणिज्य विभागातून केंद्रात प्रथम*




 शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी--
महाराष्ट्र राज्य माध्यमिक  आणि उच्च माध्यमिक विभागाच्या  बारावीच्या निकालात शिंदखेडा येथील श्री शिवाजी  विद्या प्रसारक संस्थेचे कै शंकर देवचंद पाटील उर्फ बाबुराव दादा कला आणि वाणिज्य व कै भाऊसाहेब मधुकर दिपचंद सिसोदे विज्ञान महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची  परंपरा कायम राखली आहे. 
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.१२ टक्के लागला. वाणिज्य  शाखेचा निकाल  ९६.११ टक्के लागला.तर कला  शाखेचा निकाल  ८५.४०  टक्के लागला. 
विज्ञान शाखेत एकूण २२९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून  २२७  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात १३ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत  १४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ६६  विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत  विज्ञान शाखेतून  गितेश्र्वरी राजेंद्र पाटील ही विद्यार्थीनी ८६.६७ टक्के मिळवून  प्रथम आली. तर पुजा भुषण साळुंखे  ८२.०० टक्के मिळवून द्वितीय  आणि  तेजस विलास पाटील याने ८१.८३टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला  आहे.
वाणिज्य  शाखेत एकूण १०३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून  ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात १ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत  उत्तीर्ण झाले आहेत  वाणिज्य  शाखेतून  अभिजित दगेसिंग गिरासे  हा विद्यार्थी ७८.८३ टक्के मिळवून  प्रथम आला. तर धनश्री भटू बोरसे ६९.०० टक्के मिळवून द्वितीय  आणि  पुष्कराज सुरेश बोरसे याने ६७.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला  आहे.
कला  शाखेत एकूण १४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून  ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  कला   शाखेतून  लक्ष्मण सुरेश मोरे हा विद्यार्थी ७०.५० टक्के मिळवून  प्रथम आला. तर दिक्ष्या भटू नगराळे  ७०.१७ टक्के मिळवून द्वितीय  आणि विजयसिंग दगेसींग गिरासे याने ६९.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक दाजी साहेब रोहिदासजी पाटील एक्झिक्यूटिव्ह कमिटीचे  चेअरमन आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील, स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष बापूसाहेब प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष  बापूसाहेब अशोकजी पाटील, संचालक मंडळाचे  सर्व सन्माननीय संचालक , प्रशासकीय अधिकारी भाऊसो प्रमोदजी पाटील श्री. नरेंद्रजी सुर्वे भाऊसाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. तुषार मल्हारराव पाटील उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, डॉ व्ही. एस. पवार, श्री एस. टी.राऊळ, कार्यालयीन अधिक्षक श्री राहुल मल्हारराव पाटील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात

Post a Comment

0 Comments