शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- येथील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित
एम एच एस एस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी च्या निकालात यशाची पंरपरा कायम राखली असुन परीक्षेत शाळेचा एकूण निकाल 91.30% लागला. त्यात पुष्कर शरद पवार 95.40% गुण प्रथम , दर्शन गोविंदसिंग गिरासे 89.00% गुण द्वितीय , तर रोशन तुकाराम माळी 88.00 % गुण तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एकूण 09 विद्यार्थी 85% पेक्षा जास्त, तर 24 विद्यार्थ्याना 75% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब स्वप्निल रमेश देसले, उपाध्यक्ष हसनभाई बोहरी, सचिव आनंदा एकनाथ चौधरी, सर्व संचालक मंडळ , मुख्याध्यापक टी एन पाटील , पर्यवेक्षक एस एन नेरपगार,इयत्ता 10 वी चे वर्गशिक्षक एस जी शिंपी, ज्येष्ठ शिक्षक आर पी चौधरी, व्ही एस माळी ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 Comments