Header Ads Widget

*शिंदखेडा येथील गर्ल्स हायस्कूल चा दहावी चा निकाल 94.39 टक्के - भाग्यश्री पाटील प्रथम*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - येथील एस.एम. एफ.एस. गर्ल्स हायस्कूल चा दहावी चा निकाल 94.39% टक्के लागला असुन विदयार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले. एकुण 107 पैकी 101 विद्यार्थीनींनी उत्तीर्ण मध्ये विशेष प्राविण्य 77 , प्रथम श्रेणीत 18 विद्यार्थीनींनी उत्तीर्ण झाले असुन विद्यालयात प्रथम- भाग्यश्री जीवन पाटील 94.60% द्वितीय- नेहा ज्ञानेश्वर गिरासे 93.80% तृतीय - हर्षदा विकास जाधव 93.60% तर मराठी माध्यमातून प्रथम- हेमांगी कैलास पाटील 89.40 % द्वितीय- हुमेराबी हारुन शेख 87.20% तृतीय - स्नेहा रविंद्र गिरासे 85.60% गुण मिळविले आहे. वरील यशाबद्दल शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष आबासाहेब स्वप्नील रमेश देसले , उपाध्यक्ष हसनभाई बोहरी , सचिव आनंदा चौधरी , व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक जे.पी. पाटील, पर्यवेक्षक के.के.चौधरी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments