Header Ads Widget

*शिंदखेडा येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रा. सुरेश देसले यांच्या हस्ते राजेंद्रसिंग गिरासेंचा काँग्रेस मध्ये प्रवेश - काँग्रेस मध्ये इनकमिंग ला सुरूवात पक्ष मजबूत करणार - प्रा. सुरेश देसले*




                  शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- येथील शिवाजी चौफुलीवरील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयात नुकताच शहरातील राजेंद्रसिंग गिरासे सह कार्यकर्त्यांनी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा माजी पंचायत समितीचे सभापती प्रा. सुरेश देसले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला असुन शिंदखेडा शहरातील वातावरण काँग्रेसमय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काँग्रेस पक्षात आता खऱ्या अर्थाने इनकमिंग सुरु झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते प्रा. सुरेश देसले यांनी हयावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या शिवाजी चौफुलीवरील काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रवेश सोहळा संपन्न झाला झाला. त्यात शहरातील नेहमीच तहसील कार्यालयात सर्वसामान्य कार्यकर्त्याचे समस्या व प्रश्न मार्गी लावणारे धडाडीचे नेतृत्व गुण संपन्न राजेंद्रसिंग निंबा गिरासे उर्फ बाळु यांनी काँग्रेस नेते प्रा सुरेश देसले यांच्या हस्ते प्रवेश केला. सोबत इतर कार्यकर्त्याचा समावेश होता. हयावेळी नगरपंचायत प्र. माजी नगराध्यक्ष दिपक दादा देसले , माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिपकदादा अहिरे , काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश माळी, माजी नगरसेवक किरण थोरात , अशोक बोरसे, शब्बीर खा पठाण, गोटुआप्पा महाले,कैलास वाघ, लोटन माळी , वेडु महादु माळी, प्रकाश सताळिस, योगेश देसले,उमाकांत देसले, मनोज वाडिले, विनोद माळी , सचिन देसले, रविंद्र देसले, भैय्या मराठे , पंकज देसले, महम्मद शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  शिंदखेडा शहरातील काँग्रेस पक्षाला मध्यंतरीच्या काळात आलेली मरगळ दूर करण्यासाठी स्वतः मुळ काँग्रेसी विचारधारा असलेल्या पैकी स्व. दयाराम आबा देसले यांच्या प्रेरणेने शहरात सरपंच ते सभापती पदापर्यंत पोहचलो आहे. थोडा काळ बाजूला सारत काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या कडून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिंदखेडा शहरासह जिल्हयात आनंदोत्सव झाला. काँग्रेस पक्ष ही विचारधारा आहे. पक्षात कधीच धर्म, जातीपातीचे राजकारण केले जात नाही. तळागाळातील कार्यकत्यांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष असुन भाजपाच्या चुकीचे धोरण , शेतकरी , महागाई विरोधी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या मनातून हे सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून एक हया सरकारला कर्नाटक विधानसभा निकालाने दिला आहे. तरुणांचे हृदयस्थान राहुल गांधी चे नेतृत्व पुन्हा जनता स्वीकारल्या शिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत शिंदखेडा शहरात काँग्रेस मय वातावरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण होत असल्याचे हयावेळी प्रा. सुरेश देसले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments