शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - तालुक्यातील चिमठाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हयावेळी सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. हयाप्रसंगी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन महिला सन्मान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार येथील आदर्श उपक्रमशील अंगणवाडी सेविका निर्जला पांडुरंग बोरसे यांना सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,सन्मान पत्र, शाल , श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. सदर सन्मानपत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बाल विकास विभागाचे मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. हयाप्रसंगी गटनेते तथा पंचायत समिती माजी उपसभापती दरबारसिंग गिरासे, उपसरपंच दिनेश शंकर चौधरी , ग्रा. पं. सदस्य सुरतसिंग भगतसिंग गिरासे, मनिषा हरीष नगराळे , शालिनी गिरधर पाटील, कपिल मोहनसिंग गिरासे , ग्रामसेवक एस.पी.पाटील , अंगणवाडी मदतनीस प्रमिला जितेंद्र गिरासे सह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments