शिंदखेडा तालुक्यातील मालपुर ( दोंडाईचा ) येथील सावंत परिवारातील अत्यंत संघर्षमय परिस्थितीतुन जात असतांनाच आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यासह साहित्य क्षेत्रात परिचित असलेले श्री. यादवराव पंढरीनाथ सावंत यांच्या आजच्या ( 1 जुन ) वाढदिवसानिमित्त खास मुलाखतीने त्यांच्या जिवन प्रवासाविषयी हितगुज साधणार आहोत. यादवराव सावंत हे शिंदखेडा तालुक्यातील मालपुर गावाचे मुळ रहिवासी आहेत.ते मालपुर येथील प्रवचनकार कै.आना दगा सावंत यांचे नातू तर काका- कै. तुकाराम आनाजी सावंत, श्री. उत्तम डिगंबर सावंत, श्री. रमेश डिगंबर सावंत, वडील- कै. पंढरीनाथ आनाजी सावंत , आई- विमलबाई पंढरीनाथ सावंत, पत्नी भारती यादवराव सावंत यांच्या सहवासातील सध्या शिंदखेडा येथील बी. के.देसलेनगर येथे वीस वर्षापासून रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण व बालपण तालुक्यातील आदर्श गाव चिलाणे येथे झाले. सुरुवातीपासूनच साहित्य क्षेत्रात आवड निर्माण झाली. त्यातून कविता, कथा, नाटक , विविध विषयांवर लेख लिहिण्याची आवड होती. त्यातुन पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात " अत्याचार " या तीन अंकी नाटकाचे प्रकाशन माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांच्या हस्ते 1 जुन 1997 ला करण्यात आले होते. ते कविता , कथेच्या माध्यमातून उत्कृष्ट लेखन करतांना महाराष्ट्र राज्य सह राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यात मुख्यतः दिल्ली येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.अब्दुल कलाम यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार , सिनेअभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या हस्ते हैद्राबाद येथे प्रतिभा सन्मान, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे हस्ते मुबंई येथे अत्याचार नाट्यलेखन गौरव , ज्येष्ठ कवी जगदिश खेबुडकर यांचे हस्ते काव्य गौरव पुरस्कार , नवी दिल्ली येथे माजी राज्यपाल अरुणाचल प्रदेश मा. महाप्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रस्तरीय शिक्षकश्री पुरस्कार , औरंगाबाद येथे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते काव्य गौरव, यासह आयुक्त गो.रा.खैरनार, डॉ. विश्वास पाटील, डॉ. विश्वास महिंदळे, ज्येष्ठ लेखक द.मा.मिरासदार,माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी, प्रमोद तरवडकर , माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, कै. गोपीनाथ मुंडे, लेखक कै. शिवाजी सावंत, गितकार कै.जगदिश खेबुडकर , श्रीपाल सबनीस, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख सरकार साहेब रावल आदी नामवंत मान्यवरांच्या हस्ते जवळजवळ शंभर हुन साहित्य क्षेत्रात पुरस्कार मिळविले आहेत. त्याच बरोबर मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या आर्शिवाद घेऊन मृत्युंजय महाकादंबरी अहिराणी भाषेत अनुवाद करत आहेत. मध्यंतरी च्या काळात काही अडचणी मुळे अपुर्ण असलेली महाकादंबरी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. शिवाय साहित्य क्षेत्राबरोबर शिक्षक म्हणून सेवा करित असताना जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरुन अनेक संस्था मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरापासून राज्यस्तरावर लोकसंख्या व पर्यावरण शिक्षण हया विषयावर शैक्षणिक उपकरणांची निवड झाली आहे. हे साहित्य व शैक्षणिक जबाबदारी सांभाळत असताना पत्रकारिता क्षेत्रात देखील आपला आगळावेगळा ठसा उमटवत आहेत. गेली तीस वर्षापासून हया माध्यमातून अनेक वृत्तपत्रात काम केले आहे करित आहेत. तसेच स्थानिक इलेक्ट्रानिक मिडीया च्या माध्यमातून ग्राऊंड लेवलवर सेवा देऊन दर्जेदार वृत्तांकन करित असतात. म्हणून आजही तालुक्यात जिल्ह्यात ग्राऊंड लेवल वर काम करणारा पत्रकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. चोवीस तास पत्रकारिता क्षेत्रात सडेतोड लिखाणातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. कोणत्याही पक्ष वा संस्थेच्या बातम्या आपल्या लेखणीतून सडेतोड उतर हेच त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे. एकतर्फी बातमी ला त्यांनी आजपर्यंत कुणाच्याही दबावाखाली स्वार्थासाठी आपली लेखणी बोथट केली नाही आणि भविष्यात करणार नाही असे ते नेहमीच आवर्जून सांगतात. म्हणुनच हया वर्षीचा संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र सभागृहात राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी, अभिनंदन पर शुभेच्छा सह अनेक संस्था, संघटनांनी भरभरुन प्रेम दाखवत यथोचित सत्कार देखील केला. प्रामाणिक काम हे चिरकाल टिकत राहते ते कधीच फुसट होत नाही म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करून मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यात देखील सरस उतरून योग्य प्रामाणिक सेवा देतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या हया आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि भावि आयुष्य भरभराटीचे प्रगतीचे आरोग्यदायी जावो तसेच त्यांच्या हातुन हयापुढे असेच समाजकार्य घडत राहो हिच ईश्वर चरणी मनोकामना.... सुजाण नागरिक परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.. *( संकलन - भालचंद्र पाटील - मुख्य संपादक सुजाण नागरिक )*
0 Comments