*धुळे शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता जिल्ह्यातील सामान्य नागरिक विचारु लागले आहेत. जिल्हयात आणि धुळे शहरात दररोज घडणारे घटनाक्रम पोलिसांसमोर आव्हान उभे करणारे आहेत. अवैध व्यवसाय फोफावला अतांना दिवसाआड गावढी कट्टे सापडत असून गेल्या तीन दिवसात शहरात पडलेले तीन दरोड्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ‘पोलीस अधिक्षक साहेब जागे व्हा’ अशी चर्चा होऊ लागली आहे.*
डोक्याला पिस्तुल लावून आणि घरातील लहान बालिकेस ओलीस ठेवून पांच दरोडेखोरांनी पारोळा रोडवरील पंजाबी टींबर मार्टचे मालक विनोद भसीन यांचे घरावर शसस्त्र दरोडा टाकला.21ऑगस्ट रोजी टाकलेला हा दरोडा खर्या अर्थाने पोलिसांना आव्हान देणारा होता. या कुटुंबातील लोकांना घरात बंद करुन आणि शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांचे सोने व रोकडसह दरोडेखोरानी ऐवज लंपास केला. या घटनेमुळे संबधित कुंटुंब भयथित तर झालेच परंतू शहरातील लोक या दरोडयामुळे भयभित झालेत. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर रात्रीच्या अंधारातील दरोडयानंतर 22 ऑगस्ट रोजी दिवसढवळया देवपूरमधील लक्ष्मी नगरात अवघ्या दीड तासात म्हणजे 11 ते 1 चे दरम्यान सावंत यांचे घरात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने चोरुन नेले. अवघ्या दोन तासात घरसफाई करणार्या चोरांनी पोलिसांना पून्हा आव्हान दिले. आणि या शहरात पोलीस प्रशासन आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण केला आहे. विशेष म्हणजे पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर या शहरात उपस्थित असतांना चोरटयांनी त्यांचे उपस्थितीत धुळे जिल्ह्याची ‘चोख’ पोलीस यंत्रणा किती ‘तकलादू’ आहे याचा नमूना पेश केला. या दरम्यान गावठी कट्टा घेवून फिरणार्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतू सलग तीन दिव नगांवबारी, तिखीफाटा,साक्रीरोडवर प्रवाशांच्या डोळयात मिरचीपूड फेकून व बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे कडून मुद्देमाल लुटणार्या टोळीने पोलिसांमोर आव्हान उभे केले होते. या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी दिवसा बंदुक घेवून रस्तावर लुट करणार्यांची शहरात दहशत निर्माण होईपर्यन्त पोलीस पेट्रोलिंग विभाग काय करतो ? असा प्रश्न निर्माण होतो. यासह आंनदखेडे, साक्री,आणि हाडाखेड-सांगवी जवळील चारणपाडा गांवात पोलिसांवर झालेले हल्ले आमदारांची, पोलिसांची गाडी फोडण्यापर्यंन्त संतप्त जमावाची कृती ही निश्चितच पोलीस यंत्रणेवरील उडालेला नागरिकांच्या विश्वास याची उदाहरणे म्हणता येतील. निकुंभे सारख्या लहान गावात सुध्दा चोर धाडसी चोरी करतात. अवैध गुरांची वाहतुक करणारे कसाई रात्रीतुन शेतकर्यांची गुरे, बैलजोडी, दुधाळ गायी सुमो सारख्या गाडयांमधुन सुसाट चोरी करुन नेतात, शेतातील इलेक्ट्रीक मोटारी मोठया प्रमाणावर चोरी केल्या जात आहेत. अवैध गुरांची वाहतुक आणि मांस वाहतुक पोलिसांना का दिसत नाही? जिल्हयात कुठेही शांतता आहे, चोरी झाली नाही असे चित्र नाही. अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा आणि धुळे शहर इतके नेमके कार्यक्षेत्र असलेला जिल्हा असतांना पोलीस यंत्रणाच कार्यान्वित असतांना दिसत नाही.एलसीबीच्या साध्या वेशातील पोलीस मित्रांची एकेकाळी शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर नजर असायची. त्यांचे खबरे सक्रिय असायचे. परंतू अलिकडे भांग-गांजासह अवैध व्यवसाय जिल्हाभर फोफावले असतांना पोलीस प्रशासन ‘ध्यान’ अवस्थेत डोळे मिटून का बसले आहे यावर नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. हे थोड झाले की काम म्हणून काल सायंकाळी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी साडे आठ ते साडे दहाच्या सुमारास देवपूर मधील श्रीनाथ नगर येथील कोमलसिंह सिसोदिया यांचे घरी झालेली धाडसी चोरी ही पोलीसांना आव्हान देणारी आहे. ज्या घरी चोरी झाली तेथून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन अवघे दोन किमी अंतरावर आहे. तब्बल 32 तोळे सोने व रोकड चोरुन नेण्याचा प्रयत्न यावेळी चोरट्यांनी केला आहे. शेजारी असलेल्या रहिवाशांनी आणि विद्यार्थ्यांने आपले साहस दाखवत या चोरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला त्याला चोप देखील दिला परंतू तो त्यातुन निसटला. प्रश्न असा आहे की, एक आठवडयात सलग तीन दिवसात तीन दरोडे या शहरात दिवसाढवळया पडत असतांना पोलीस प्रशासन खरोखरच जनतेच्या सुरक्षेसाठी काम करते आहे का ? की राजकीय लोकांसारखे हास्-तूरे घेण्यात मग्न आहे, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत. धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची निष्क्रीय कार्यपद्धती आणि वाढलेली गुन्हेगारी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गुन्हा अन्वेशण शाखा आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात समन्वय असावा असा आजपर्यंन्तचा इतिहास आहे. परंतू अलिकडच्या काळात यात कुठेही समन्वय दिसून येत नाही. अवैध व्यवसायांचा सुळसुळाट कशाचे प्रतिक आहे ? शहरातील वाहतुक व्यवस्थेचे पार धिंडवडेे उडाले आहेत. मुलींची आणि महिलांची छेडखाणी होते आहे. मुलींचे अपहरण होत आहे. मोटरसाईकल बुलेट सुसाट चालविणार्यांचा नागरिकांना फार मोठा त्रास होतो आहे. जुगारांचे अड्डे, गावठी दारू निर्मितीचे अड्डे, विना परवाना मद्यविक्री सुरु असलेले हाटेल व ढाबे, ठेला गाडयांवर विकली जाणारी दारु खरोखर हप्ते घेवू सुरु आहे का? अशी चर्चा नागरीकांमध्ये होते आहे. आणि सुरु असेलत त्यासाठी कोणतीही हरकत नाही. परंतू सामान्य नागरिकांचे आपले घर तासभर सुध्दा बंद करुन बाहेर पडायचे नाही की? असे असेल तर शहरातील नागरिक पोलीसांच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या दीड तासात दिवसा ढवळया पडलेले दरोडे पोलिसांसाठी आव्हान देणारे आहेत. पोलीसांची कोणत्याही प्रकारची दहशत गुन्हेगारांमध्ये दिसत नाही. पोलीसांच्या छातीवर टिच्चून धाडसी चोर्या व दरोडे पडत आहेत. घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न आता प्रत्येक कुटूंबाला पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घराघरांत या घटनांनी भितीचे वातावरण पसरले आहे.सर्व पोलीस यंत्रणा रात्रदिवस कामाला लावून या गुन्हांची उकल करुन शहरासह जिल्हयातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती, दूर करण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी ंपूर्ण यंत्रणेला कामाला लावण्याची आवश्यकता आहे. पेट्रोलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे. राज्यकर्ते झोपलेले असल्याने पोलीसांनी तरी जागृत राहून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडावीअशी जाहीर विनंती आम्ही पोलीस प्रशानाला करतो आहोत. पोलीस प्रशासनाने जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढचा नंबर कोणत्या परिसरात व कोणत्या घराचा लागतो जो पोलीसांसाठी पुन्हा आव्हान देणारा ठरेल. असे होवू नये.असे आम्हास वाटते. तुर्तास एव्हढेच.
*दैनिक पोलीस शोध*साभार
0 Comments