------------------------------
*धुळे- (प्रतिनिधी)* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना बादशाह औरंगजेबाच्या आग्रा येथील किल्ल्यातून (नजरकैदेतून) निसटून राजगडावर सुखरूप पोहोचायला यावर्षी तब्बल ३५७ वर्ष झालीत. त्या घटनेचे एक ऐतिहासिक स्मरण म्हणुन दरवर्षी पुणे येथील गरूडझेप संस्थेचे अनेक मावळे शिवज्योत मशाल हाती घेऊन किल्ले आग्रा ते राजगड पायी धावत येत असतात. आज या मशाल यात्रेचे देवपूरातील नगाव बारी नजीकच्या केशरानंद गार्डन येथे आगमन झाल्यानंतर स्वागत समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. छ.शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील पायदळ प्रमुख सरदार पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज श्री. आबाजीराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही मशाल यात्रा आज आग्राहून धुळ्यात पोहोचली. यावेळी केशरानंद गार्डन मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुभाष भामरे हे होते. तर विचार मंचावर पदयात्रेचे प्रमुख मारुतीआबा गोळे प्रमुखअतिथी म्हणुन धुळे शहराच्या महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी, बोरकुंडचे बाळासाहेब भदाणे,शिवसेनेचे डॉ.सुशील महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले,डॉ.माधुरी बाफना,सौ. शुभांगी पाटील, ज्ञानेश्वर भामरे, साहेबराव देसाई,सुधाकर बेंद्रे आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. तद्नंतर महिला ब्रिगेडच्या सौ. सुलभाताई कुंवर,मीनल ताई पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर करून जिजाऊना मानवंदना दिली. यानंतर महापौर सौ. प्रतिभाताई यांनी शिवरायांच्या आग्रा येथून निसटून राजगडावर सुखरूप पोहोचल्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी गरूडझेप ही मोहीम दरवर्षी मशाल पदयात्रा काढत असल्याने त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यानंतर शिवज्योत मोहिमेचे प्रमुख मारुतीराव गोळे यांनी शिवरायांचा पराक्रम,धाडस त्यांचे शौर्य व इतिहास भावी पिढीला कायम स्मरणात रहावा यासाठी ही मशाल पदयात्रा सुरू केल्याचे सांगून तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालून निर्व्यसनी जीवन जगावे असा या मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की धुळे व रत्नागिरी या जिल्ह्यातील शिवप्रेमी दरवर्षी जे स्वागत करतात असं प्रेम कुठेच होतांना दिसत नाही. या मोहिमेतील एक शिलेदार भूपेश पाटील यांनी शिवरायांना गारद् दिली त्यावेळी अतिशय मंत्रमुग्ध असे शांत वातावरण तयार झाले होते.तसेच शेवटी अध्यक्षीय भाषणात धुळ्याचे लोकप्रिय खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहस,पराक्रम,त्यांच्या वाट्याला आलेला प्रचंड संघर्ष व त्यातून त्यांनी या सर्व गोष्टींवर मात करून निर्माण केले रयतेचे स्वराज्य याविषयी सविस्तर माहिती सांगून इतिहासाला उजाळा दिला. तसेच या पदयात्रेतील मावळ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वागत समितीचे प्रमुख निंबा मराठे यांनी केले. तर आभारप्रदर्शन मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य सर्वश्री विनोद जगताप, संदीप पाटोळे,विरेंद्र मोरे, प्रदीप जाधव,महेश गायकवाड, कैलास बापू मराठे,राजेंद्र मराठे,साहेबराव देसाई, राजेंद्र काळे,विजय देवकर,दीपक रौदळ,जगनबापू टाकते, कैलास वाघारे, हेमंत भडक, शाम निरगुडे,सुनील ठाणगे, डॉ. संजय पाटील, नगरसेवक राजेंद्र पवार,मनोज ढवले,श्रीरंग जाधव,नानासाहेब कदम,अर्जुन पाटील, विकास बाबर,हेमंत बागूल,मनोज रुईकर,देव पवार,संदीप सुर्यवंशी,अमोल मराठे,राजू सरोदे,दिनेश काळे,विलास टाकते,विशाल बागूल,भरत वाघारे,भालचंद्र सोनगत, अमर फरताडे, रावसाहेब मंडाले,भैय्या जिवरक आदींचा सहभाग होता. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,पत्रकार अतुल पाटील,नगरसेवक राजू पवार,नानासाहेब बगदे,भोला वाघ, प्रा. बी. ए. पाटील,राजेंद्र जाधव, सुबोध पाटील,मनोज घोडके, दिनेश चव्हाण,नंदू अहिरराव,प्रा. वैशाली पाटील,सौ.सुरेखा नांदरे, अर्चना पाटील,ललिता वडीले, उषा नांदरे, ज्योती पाटील, गोविंद वाघ, विक्रम काळे, उमेश मराठे, गजेंद्र पाटील, देवेंद्र मराठे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..
-------------------
0 Comments