Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील कुरूकवाडे येथे श्रीराम मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त संगितमय रामायण कथा*

    

  शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --                        श्रीराम पंचायतन देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव सोहळा पार पडला. कुरूकवाडे येथील नागपंचमी या शुभमुहूर्तावर श्रावण मासानिमित्त या पवित्र मासामध्ये पुण्याचा सहभागी होऊन संपूर्ण कुरूकवाडे व पंचक्रोशीतील भाविक भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने माता-भगिनींनी रामायण कथेचा अतिशय सुंदर पद्धतीने आनंद व मनमुराद भक्तीची गंगा कुरूकवाडे गावात वाहून घातली तसेच आदित्यराणूबाई कानुबाईचा ही उत्सव सुरू असल्यामुळे अत्यंत भाविकांनी रसाळ अशा कथेमधून श्रवणीय आनंद घेऊन रामाच्या चरित्राचे रामचरितमानस हे गुणगान कथाकार पंडित बाळकृष्ण दीक्षित महाराज यांनी केले. शोभायात्रा ही काढली. हयासाठी श्रीराम भजनी मंडळ चे संजय मोरे, प्रकाश माळी, अशोक जाधव, नंदलाला अहिरे, निळकंठ पाटील, धनराज माळी, दगा भदाणे, नथ्थु भदाणे, प्रकाश सोनार, पुंडलिक माळी, भगवान गिरासे, गुलाबसिंग गिरासे, युवराज पाटील, यशवंत जाधव, जिजाबराव माळी यांचे सहकार्य लाभत आहे. श्रीराम दरबार मुर्ती मानकरी कुलकर्णी व पंडित परिवारातर्फे केले. यासाठी श्रीराम भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ, नवयुवक मित्र मंडळ कुरूकवाडे यांचे सहकार्य लाभत आहे. रामायण कथेचा सात दिवस चालणार असुन गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सांगता 28 आगस्ट सोमवार रोजी काल्याचे किर्तनाने होणार आहे

Post a Comment

0 Comments