धुळे (प्रतिनिधी) : -
कृषि पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत मा.जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल सर यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी पंचायत समिती, शिरपूर येथे मा सभापती श्री वसंत पावरा यांचे अध्यक्षतेखाली शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष व सदस्य व शेतकरी बांधव, महिला गट सदस्य यांचे साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत कृषि पायाभूत सुविधा निधी योजने बाबतची सविस्तर माहिती उपप्रकल्प संचालक विनय बोरसे यांनी दिली. श्री जयेश जगताप अर्थ शास्त्रज्ञ, स्मार्ट प्रकल्प यांनी उपस्थितांना 3 टक्के व्याजदर सवलती साठी ,agriinfra.dac.gov.in पोर्टलवर अर्ज कसा करावा या बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री अभिजीत रंजनकर यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत बॅकाचा सहभाग बाबत माहिती दिली. बोराडी परीसर शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष श्री रमन पावरा यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत त्याचा अन्न धान्य साफसफाई, प्रतवारी चा मंजूर प्रकल्प बाबत चे अनुभव कथन केले. कार्यक्रम प्रसंगी आत्मा चे प्रकल्प संचालक श्री नवनाथ कोळपकर,श्री नवनाथ साबळे, कृषि अधिकारी, शिंदखेडा, माविम च्या ललिता माळी व उमेद चे रामकृष्ण पाटील उपस्थित होते. कार्यशाळा प्रसंगी माजी सभापती श्री सत्तारसिंगपावरा,जगनदादा पावरा, कृषि रत्न शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष श्री धनराज राजपूत, बाबाकुवर शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष श्री पावरा ,तापीमाई शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष श्री नरेंद्र भामरे, सुरमई शेतकरी उत्पादक कंपनी चे अध्यक्ष श्री सुधाकर वाघ,संजय पाटील, शिंदखेडा शेतकरी उत्पादक कंपनी चे श्री सिध्दांत साळुंखे, श्री हंसराज खैरनार अग्रीक्रांती सोलुशन प्रा लि चे अध्यक्ष प्राधान्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ढोडरे कृषि अधिकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विशाल मोटे,कृषि अधिकारी,शिरपूर ,श्री वसावे कृषि अधिकारी व संदिप पवार बीटीएम, शिंदखेडा तसेच सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांनी परीश्रम घेतले. कृषि पायाभूत सुविधा निधी योजने च्या कार्यशाळा प्रसंगी प्रकल्प संचालक आत्मा धुळे श्री नवनाथ कोळपकर व श्री कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे यांनी लाभार्थी जोडणी अभियान पंधरवड्यात जास्तीत जास्त लाभार्थी ची पोर्टलवर नोंदणी करणे बाबत उपस्थितांना अवाहन केले .
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि मराठी पत्रकार परिषद मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://kutumbapp.page.link/oHzGjb4Vrekasv98A?ref=Y3JWS
0 Comments