Header Ads Widget

*उज्वल शैक्षणिक संकुलात चंद्रयान 3 चे थेट प्रक्षेपण*




 शिंदखेडा - येथील  श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर, निवासी मूकबधिर विद्यालय  यांचा  संयुक्तिकरित्या



भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प चंद्रयान तीन चे यशस्वी लँडिंग चे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य एम.डी.पाटील व मुख्याध्यापिका ए.के.माळी यांच्या हस्ते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डॉ.आर.आर. पाटील संस्थेचे सचिव  दादासाहेब श्री.उज्वल आर.पाटील, कार्यकारी संचालक दादासाहेब श्री अनिल पाटील यांनी इसरोच्या शास्त्रज्ञांना व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मोहीम यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कासिम शेख इयत्ता-५ वी या विद्यार्थ्याने चंद्रयान तीन ची प्रतिकृती तयार केली होती विद्यार्थ्यांचा व त्याचा पालकांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेतील प्रत्येक शिक्षक शिक्षिका यांनी चंद्रयान एक, दोन, तीन तसेच अंतराळ संशोधनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments