अमळनेर तालुक्यातील तळवाडे येथील पोलीस पाटील पद रिक्त होते अमळनेर विभागात नुकतीच पोलीस पाटील पदाची भरती काढुन परीक्षा घेण्यात आली यात शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील सविता लोटन पाटील ही लेक अमळनेर तालुक्यातील तळवाडे येथील शेखर रवींद्र पाटील यांची पत्नी नुकत्याच घेण्यात आलेल्या पोलीस पाटील च्या परीक्षेत सर्वोत्तम गुण व परीक्षेच्या आधारावर लेखी व तोंडी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अमळनेरचे प्रांत अधिकारी महादेव खेडकर यांनी पारदर्शक भरती करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली यावेळी तळवाडे येथील पोलीस पाटील पदी सविता लोटन पाटील यांची निवड करण्यात आल्याने तळवाडे गावाची पोलीस पाटील पदाची जबाबदारी या तरुण सुशिक्षित मितभाषी महिलेची निवड झाल्याने गावात कायदा तसेच सुव्यवस्था व महसूल विभागातील कामकाजात मदत होणार आहे यावेळी नवनिर्वाचित पोलीस पाटील सविता पाटील यांनी शासनाने गुणवत्तेनुसार केलेली निवड मी माझ्या कामाची जबाबदारी व प्रामाणिकपणे गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणार महसूल यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य करून आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणार यावेळी नवनियुक्त पोलीस पाटील सविता पाटील यांनी गावाची जबाबदारी व सेवा करण्याची जी संधी मिळाली त्या संधीचे सोने करून गावात कायदा सुव्यवस्था व शांतता प्रिय गाव ठेवण्याचा प्रयत्न करीन कारण आमच्या घराण्यात सातवी पिढी पासून हे पद चालत आले असून वडीलधारी मंडळींचा अनुभव व घरातील वारसा यामुळे हे पद साभाळणयास मदत होणार आहे नवनिर्वाचित पोलीस पाटील सविता पाटील यांची गावकऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या निवडीबद्दल भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी अभिनंदन केले
0 Comments