Header Ads Widget

धमाणे-*नुतन विद्यालयात बक्षीस वितरण संपन्न*




धमाणे- *नुतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धमाणे* येथे *सावता परिषद कुरुकवाडे * यांच्या वतीने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानीमीत्त आयोजीत निबंध स्पर्धेतील वीजयी विद्यार्थ्यांना भागवतकार दिक्षीत महाराज, हभप अशोक महाराज कुलकर्णी नानासो निळकंठ पाटील,हभप प्रकाश आप्पा,हभप चोपडेकर महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.भागवतकार दिक्षीत महाराजांनी जीवणात शिक्षक आणि अभ्यासाचे महत्व विषद केले  बक्षीसपात्र लहान गटातुन ज्ञानश्री कुंदन सोनवणे प्रथम,नव्या अविनाश पाटील द्वीतीय,राहुल पुंडलीक माळी तृतीय,निल केदारसिंग गिरासे व साई दिपक पाटील उत्तेजनार्थ व मोठ्या गटातुन तनुजा सतिष पाटील प्रथम,साहील विलास सोनवणे द्वीतीय,कीर्ती अशोक हिरे तृतीय,वर्षा हींमत बोरसे व सलोनी केदारसिंग गिरासे उत्तेजनार्थ हे होते  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे *मुख्याध्याध्यापक श्री एस आर पाटील*  तर प्रमुख पाहुणे म्हणुन *शिरोमणी संत सावता महाराज परिषद संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता, चि. विशाल माळी* हे होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री एस एस भदाणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारि यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री के एस रजाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल माळी यांनी केले

Post a Comment

0 Comments