*धुळे : शिरपूर उपविभाग कार्यक्षेत्रातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील पोलीस पाटील संवर्गातील 48 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पोलीस पाटील पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, शिरपूर, जि.धुळे येथे सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिरपूर भाग, शिरपूर प्रमोद भामरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सोडत बैठकीत शिरपूर तालुक्यातील 26 गावांमध्ये- बुडकी, वासर्डी, वाडी ब्रु., वडेल खु, वरझडी, फत्तेपूर (क), हिवरखेडा, भोईटी, चिलारे, अभाणपूर, तांडे, भोरखेडा, गोदी, हिसाळे, सावेर, हेंद्रयापाडा, हिंगोणीपाडा, ममाणे, जुने भामपूर, लोंढरे, अर्थ ब्रु., अर्थ खु., जातोडे, सावळदे, अजंदे बु, नाथे असे एकूण 26 पोलीस पाटीलचे पदे रिक्त आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील 22 गावांमध्ये- सार्वे, पिंपरखेडा, बाभळे, अजंदे ब्रु, दलवाडे प्र.सो, सोंडले, पाष्टे, निमगुळ, दभाषी, अजंदे खुर्दे, शिराळे, रहिमपूरे, दाऊळ, पढावद, भिलाणे दिगर, कलवाडे, अक्कडसे, विखरण, अमळथे, पाटण, सुलवाडे, सतारे असे एकूण 22 पोलीस पाटीलची पदे रिक्त आहेत.
पोलीस पाटील भरती 2023 आरक्षण सोडतीच्या बैठकीस संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे,
0 Comments