Header Ads Widget

भडणे येथील आदिवासी तरुणाचा अंत्यविधीच्या खर्च केला,,,,,,,,,,,,, भडणे येथील पोलीस युवराज माळी पाटलांनी जोपासली सामाजिक बांधिलकी,,,,,,,,




शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदिवासी वस्तीत राहणारा भिल्ल समाजाचा तरुण नाना सजन अहिरे वय 38 याला दिनांक 21 रोजी तब्येत बिघडल्याने त्याला धुळे येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले होते मात्र दिवसेंदिवस तब्येत खालावल्याने त्याचा दिनांक 23 ऑगस्ट रोजी निधन झाले 38 वर्षे तरुण हा गावात अतिशय प्रामाणिक इनामदारने गावात प्रत्येकाच्या घरी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवीत होता मात्र घरी गरिबीची  परिस्थिती असल्याने त्याला धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पोलीस पाटील व गावकरी यांनी दाखल केले व उपचारही करून घेतले मात्र तब्येतीने साथ न दिल्याने त्याचा अखेर मृत्यूशी लढत असताना  उपचारा दरम्यान धुळे येथील जिल्हा रुग्णालयात निधन झाले अतिशय प्रामाणिक स्वच्छ प्रतिमा व काम करण्याची धडपड कामासाठी कोणाचेही मदतीला धावून जाणे एका पायाने अपंग असताना देखील मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा   त्याचा हा स्वभाव होता म्हणून त्याला संपूर्ण गावकरी नाना हा प्रत्येकाचा लाडका होता कोणी कुठलेही काम सांगितले तर नाही न म्हणणारा हा त्याच्या स्वभाव होता त्यांना दोन मुली एक मुलगा आई भाऊ असा परिवार आहे मात्र त्याचे दिनांक 23 रोजी निधन झाल्याने मात्र घरची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याकारणाने अंत्यविधीचा खर्चही त्यांना करता येणार नव्हता भडणे आशा दुःख प्रसंगी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी संपूर्ण अंत्यविधीचा व अंत्यसंस्काराचा खर्च स्वखर्चाने करून एक सामाजिक बांधिलकी जोपासल्याने त्यांचे सर्वत्र   कौतुक केले जात आहे ते नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात व समाज कार्यासाठी सर्वच क्षेत्रात मदतीसाठी धावून येतात

Post a Comment

0 Comments