Header Ads Widget

*दिव्यांच्या कल्याणकारी योजनेचे लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांची घुसखोरी थांबेल का?



धुळे जिल्ह्यात दिव्यांगच्या कल्याणकारी योजना दिव्यांगच्या दारी या उपक्रम जिल्हा प्रशासन तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू भाऊ कडू हे ६ सप्टेंबर रोजी दिव्यांगच्या कल्याणकारी योजना दिव्यांगच्या दारी या शासनाचा उपक्रमासाठी येत असल्याची माहिती सोशल मीडियावर आहेत. दिव्यांगणांच्या विविध योजनांचा आढावा घेतील. आमदार बच्चू भाऊ कडूंना खरे दिव्यांग कोण? याची तपासणी करण्याचा आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे. खरा लाभार्थी दिव्यांगाला लाभ मिळतो का? बोगस दिव्यांगच याचा लाभ घेतात शासनाने दिव्यांग बांधवांना विविध योजनाच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु धुळे जिल्ह्यासह दोंडाईचा शहरात बोगस दिव्यांग अर्थात अपंगाचा खोटा दाखला घेऊन योजनेचा फायदा घेत आहेत. कर्णबधिर व खराब डोळे अशा दिव्यांगाची वाढती संख्या वाढत असल्याने खरे दिव्यांग बांधवांवर अन्याय आहे. वैद्यकीय अधिकारींच्या तपासणी नंतर दिव्यांग व्यक्तींना स्मार्ट कार्ड देण्याची योजना आहे त्यात आॅनलाईन नोंदणी करुन तीन वैद्यकीय डॉक्टरांच्या तपासणी नंतर किती टक्के दिव्यांग आहे याची खात्री झाल्यावर दिव्यांग व्यक्तीला कार्ड देतात. परंतु खाजगी दलालांच्या मदतीने बोगस दिव्यांग कार्ड तयार करुन रेल्वे,एसटी बस मध्ये वनफोर टिकीटचा लाभ घेण्याऱ्यांची संख्या बस मध्ये जास्त दिसते वाहक,चालक यांना कळते परंतु काही करु शकत नाही. बोगस कर्णबधिर व्यक्तीला ऐकायला येते परंतु ऐकु येत नाही असा बहाणा करावा लागतो आधीच बस मध्ये महिलांना अर्ध टिकीट व दिव्यांगांना वनफोर अशा या योजना आहेत त्यामुळे पुर्ण टिकीट घेणारे फार कमी झालेत कारण पुर्ण टिकीट घेऊन बस मध्ये बसायला जागा मिळत नाही. त्याचे कारण खरे दिव्यांग बांधव कमी असतात तर बोगस दिव्यांग पैसे देऊन कार्ड तयार करुन घेतलेले कर्णबधिर व खराब डोळे असलेले दिव्यांग जास्त दिसतात त्यात कमी पगारावर खाजगी बॅंकेत नोकरी करणारे व काही दररोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग पुर्ण पगार घेऊन बोगस दिव्यांगचे कार्ड तयार करुन वनफोर टिकीटावर ये-जा करतात. काही बोगस दिव्यांग व्यक्तीच्या एकाच घरातील चार- पाच सदस्यांकडे बोगस अपंग कार्ड मिळेल एकाच घरात चार-पाच व्यक्ती दिव्यांग असु शकतात का? अशी शंका येते त्याचाही जुगाड एकाने कार्ड घेतले तर बाकी सदस्यांची आपोआप लाईन लागते असा हा काळा बाजार सुरु आहे. शासकीय सवलती दिव्यांग बांधवांसाठी आहेत परंतु याचा मोफत फायदा घेण्यारे बोगस दिव्यांग दिसतात यामुळे खरे दिव्यांग पात्र असतांना लाभ मिळत नाही असे अनेक बोगस दिव्यांग आहेत की सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत यामुळे खरे गरजवंत दिव्यांगांवर अन्याय होत आहे चार - पाच वर्षापूर्वी असलेल्या दिव्यांगचा याद्या पहा त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणारे आमदार बच्चू भाऊ कडू धुळे जिल्ह्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणकारी योजना दिव्यांगच्या दारी या कार्यक्रमा निमित्त खरे दिव्यांग किती? आहेत आणि बोगस दिव्यांग किती? आहेत याची तपासणी करण्याची गरज आहे  तसा आदेश आमदार बच्चू भाऊ कडू यांनी दिला तर अनेक बोगस दिव्यांग कार्ड जमा होतील.....
✍️✍️✍️ अहिल्या न्यूज मिडिया* साभार 

Post a Comment

0 Comments