Header Ads Widget

बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनअभावी सुविधा रामभरोसे




बेटावद ---राहुल जी पवार
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक वर्षापासून कर्मचारी भरती झालेले नाहीत त्यामुळे गावाला पर्यायाने परिसराला व रुग्णसेवेला मोठा फटका बसत आहे.
या सर्व भोंगळ कारभाराचा नाहक त्रास रुग्णांना भोगावा लागत असल्यामुळे त्यांना शारीरिक,आर्थिक संकटांना मोठ्या प्रमाणात सामना करावा  लागत आहे.
बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हळसर, मुडावद, पडावद, पास्ष्टे,वारुड, अजंदे बु., तसेच अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील शहापूर, एकतास, एकलहरे,बाम्हणे, कळंबू,मुडी आदी गावांमधून देखील रुग्ण या ठिकाणी येत असतात.
तसेच जर अचानक पणे प्रसुतीसाठी एखादी महिला या आरोग्य केंद्रात आली तर तिच्यावर उपचार करण्यासाठी तेथे रात्रपाळीचा वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला इतरत्र ठिकाणी दाखल करावी लागते याचा नाहक  त्रास नातेवाईकांना नेहमीच होत असतो.

रिक्त पदे :-
१) वैद्यकीय अधिकारी -२

 २)औषध निर्माण अधिकारी- १

३) प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी-१

४) आरोग्य सेविका- (कायम)- ४ 

५)आरोग्य सेवक- ३

६) परिचर- ३

प्रतिक्रिया

१) देविदास माळी
अध्यक्ष, रुग्ण कल्याण समिती बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र

आम्ही वेळोवेळी जिल्हा परिषद व आरोग्य विभाग यांच्याकडे कर्मचारी मागणीसाठी निवेदन सादर केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर कर्मचारी आरोग्य केंद्रावर दाखल होतील.

Post a Comment

0 Comments