Header Ads Widget

**शिंदखेडा -जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन **




   शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय  येथे 5 सप्टेबंर  शिक्षक दिनानिमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सर्वप्रथम  संस्थाध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील व विद्यार्थी मुख्याध्यापिका कु पूनम माळी यांच्या शुभहस्ते डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी, खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे, सचिव ताईसो श्रीमती मिरा मनोहर पाटील , प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने , पर्यवेक्षक श्री उमेश देसले, ज्येष्ठ लिपीक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थाअध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 
    शालेय  अध्यापनाचे दिवसभराचे कार्य विद्यार्थीनी मुख्याध्यापिका पुनम माळी यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता 9 व 10  वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सांभाळले.. तसेच दिवसभरातील आलेले अनुभव व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा परिचय कु.अंकिता माळी,मानसी परदेशी, श्वेता बेहेरे,सारिका बेहेरे भूमिका पिंपळे ,जयकुल गिरासे,नेहा मोरे यांनी आपल्या मनोगतातून करून दिला 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले.सर्व  शिक्षकांनी विद्यार्थी शिक्षकांचे आजच्या कामाबद्दल अभिनंदन व कौतुक केले .

Post a Comment

0 Comments