Header Ads Widget

*शिरपुर भाजपा तर्फे दि. 26 जानेवारी. प्रजासत्ताकाच्या या वर्धापन दिन साजरा*




   शिरपुर : भाजपा तर्फे आज भारतीय गणतंत्राच्या आरंभाचा पवित्र दिन 26 जानेवारी. प्रजासत्ताकाच्या या वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यालय प्रांगणात शिरपूर येथे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. आमदार काशिराम पावरा यांचा हस्ते भारत माता प्रतिमा पुजन करण्यात आली. व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ. अतुल बडगुजर यांचा डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची प्रतिमा पुजन करण्यात आले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड परिश्रम घेऊन दूरदृष्टीने निर्माण केलेले भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा उद्‌घोष करते.
आज लोकशाहीच्या या मजबूत पायाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत सर्वांना जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे राष्ट्र म्हणून अभिमानाने आपण आपल्या देशाचे नाव घेतो. प्रजासत्ताक राष्ट्राचे नागरिक असल्याने आपल्याला मिळालेले हक्क आपण वापरतोच, परंतु त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हेच प्रजासत्ताक दिनाला चिरायु करण्यासाठी एक पाऊल टाकणे होय असे आमदार काशिराम पावरा यांनी नमुद करुन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, प्रशांत राजपुत, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, शिरपूर मर्चंट बॅन्क व्हा चेअरमन रामदास पुरी, शहराध्यक्ष प्रकाश गुरव, बाराबलुतेदार महासंघ शहराध्यक्ष  रमेश चौधरी, अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष रफीक तेली, भाजपा जिल्हा सदस्य योगीराज बोरसे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, जेन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष गणेश जैन, पत्रकार राजुलाल मारवाडी, पत्रकार राजु भावसार, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र गिरासे, तालुकाध्यक्ष अर्जुन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नितीन गिरासे, राजस्थान प्रकोष्ठ तालुका संयोजक भुपेश अग्रवाल, कुळखळी माजी सरपंच अवधुत मोरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments