Header Ads Widget

*दैनंदिन व न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा- मा.दिवाणी न्यायाधीश आदित्य नाईक यांचे आवाहन*




 दोंडाईचा (प्रतिनिधी )* महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करून दैनंदिन तसेच न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्यात यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश आदित्य घ नाईक यांनी केले.
 दिनांक 25 जानेवारी रोजी दोंडाईचा न्यायालयात तालुका विधी समिती व वकील संघाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. दोंडाईचा न्यायालयाचे जेष्ठविधीज्ञ एन पी अयाचित यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे व तिचा न्यायालयीन क्षेत्रात वापर केल्यास पक्षकारांना सोयीचे होईल असे प्रतिपादन केले. ऍड पी जी पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड पी एस मराठे यांनी केले. कार्यक्रमात सहाय्यक सरकारी वकील ए डी कुलकर्णी, ऍड ई बी भावसार, ऍड एम बी रूपचंदानी, ऍड एम जी शाह, ऍड आर एच धनगर, ऍड महेंद्र जाधव, ऍड मनीषा वाघ सह इतर विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments