Header Ads Widget

*सार्वजनिक ध्वजारोहणाची पंरपरा प्रशासक काळात बंद होईल का?


 आज २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा दोंडाईचा शहरात दादासाहेब रावल स्टेडियम मध्ये सार्वजनिक ध्वजारोहणाची पंरपरा असते सार्वजनिक ध्वजारोहणाचा मान शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्षांचा असतो. सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमाची वेळ सव्वा नऊ वाजता असते हिच वेळ सर्वांना सोईस्कर असल्याने कार्यक्रमाला शोभा असते सार्वजनिक ध्वजारोहण म्हणजे देशप्रेमी, देशभक्त, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिकांना राष्ट्र ध्वजाला सलामी देता येईल म्हणून सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याची पंरपरा आहे.  नगरपालिका,पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि शाळा, महाविद्यालयांची ध्वजारोहणाची वेळ सव्वा आठ वाजेची असते कारण सर्व शासकीय कार्यक्रम आटोपून सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यार्थी व अधिकारी आणि नागरिकांना उपस्थित राहता येईल त्यानुसार कार्यक्रम घेण्याची पंरपरा सुरु आहे नगरपालिकेत सत्ता रावल गटाची असो का? देशमुख गटाची असो आप आपले कार्यकर्ते शिक्षक, विद्यार्थी तसेच एनसीसी विद्यार्थ्यां मुळे कार्यक्रमाची शोभा वाढते अशी प्रथा सुरु असतांना गेल्या दोन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक बसले आहे प्रशासक आशा गांगुर्डे मॅडम आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले परंतु सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप मिळत नसेल तर  कार्यक्रम सार्वजनिक कसा? नेहमी प्रमाणे सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप झाल्या नाही कार्यक्रमाची वेळ बदलून मर्यादित लोकांचा कार्यक्रम झाला सार्वजनिक कार्यक्रम सव्वा नऊचा असतो परंतु प्रशासक घाईघाईने साडे आठ वाजता उरकून घेतात त्यामुळे देशभक्त, देशप्रेमी नागरिकांना राष्ट्रध्वजाला सलामी देता आली नाही हा प्रशासकाचा मनमानी कार्यभार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु असून अनेक वर्षांची परंपरा खंडीत होते की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. प्रशासक यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे परंतु पंरपरे नुसार त्याच वेळेला सार्वजनिक लोकांना बोलवून ध्वजारोहण केले तर देशभक्त, देशप्रेमी नागरिकांना राष्ट्र ध्वजाला मानवंदना देता तरी देता येईल....
✍️✍️✍️ अहिल्या न्यूज मिडिया*साभार 

Post a Comment

0 Comments