Header Ads Widget

*शिंदखेड्यात अखेर नवीन भाजीपाला मार्केट सुरू* *अन्य भाजी विक्रेत्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी*



शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -
शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी चौकात नव्याने बांधण्यात आलेले भाजीपाला मार्केट गुरुवार (ता. २५) पासून विक्रेत्यांसाठी खुले करण्यात आले. विक्रेत्यांनी तेथे आपली दुकाने थाटली असून, ग्राहकांनी नवीन भाजीपाला मार्केटमधून भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले.

शहरात अनेक वर्षांपासून भाजी विक्रेत्यांचा प्रश्न प्रलंबित होता. येथील भाजी विक्रेत्यांना आपले हक्काचे ओटे मिळावेत म्हणून नगरपंचायतीच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६३ लाख रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जुन्या धर्मशाळेच्या जागी भाजी विक्रेत्यांसाठी ५९ ओट्यांचे बांधकाम करण्यात आले.
शिंदखेडा नवीन भाजीपाला मार्केटमध्ये विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने.
गेल्या तीन वर्षापूर्वीच हे बांधकाम झाले. जुलैमध्ये या ओठ्यांचा लिलाव नगरपंचायतीतर्फे करण्यात आला होता. अखेर पाच महिन्यांनंतर गुरुवारपासून
या मार्केटमध्ये भाजी विक्रीसाठी त्यांना आपल्या हक्काच्या जागेवर भाजीपाला विकण्यासाठी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. शहरात शंभराहून
अधिक भाजी विक्रेते व फळ विक्रेते असून, इतर विक्रेत्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावा, अशी मागणी आता होत आहे.
गेल्या ३८ वर्षांपासून शिंदखेडा शहरात भाजी मार्केटचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक वर्षापासून भाजी बाजार मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरत आहे. विक्रेत्यांसाठी हक्काची जागा, ओटे मिळावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. नगरपंचायतीमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६३ लाख रुपयांच्या खर्चातून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जुन्या धर्मशाळेच्या जागेवर ५९ ओटे बांधण्यात आले, तीन वर्षांपूर्वी या भाजी मार्केटचे काम पूर्ण झाले, ते उ‌द्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर नगरपंचायतीने पाच महिन्यांपूर्वी लिलाव प्रक्रियेतुन पुर्ण केली.
 *पर्यायी जागेची मागणी* 
 शिंदखेडा शहराचा विस्तार वाढला आहे. शहराचा विस्तार व वाढलेल्या भाजीपाला विक्रेत्यांची संख्या पाहता सध्याचे भाजी मार्केट विक्रेत्यांसाठी अपूर्ण पडणार
असून, बाकी भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर सर्व विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
जुलैमध्ये या ओट्यांचा लिलाव केला व गुरुवारी विक्रेत्यांसाठी मार्केट खुले झाले. ग्राहकांनी नवीन भाजीपाला मार्केटमध्ये भाजी व फळ खरेदीसाठी जावे, असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments