शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- येथील एस. एम. एफ. एस. गर्ल्स हायस्कूलमध्ये ७५ प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर
संस्थेचे अध्यक्ष आबासो. श्री. स्वप्निल देसले, सचिव नानासो. श्री. आनंदा चौधरी, उपाध्यक्ष दादासो. हसनभाई शमशी, संचालक माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, श्री. एम. वाय. पवार, श्री. चंद्रशेखर चौधरी, श्रीमती शैलाताई देसले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य एस. डी. गुजराथी, माजी मुख्याध्यापिका सौ. एस. डी. ठाकूर, सौ. एल. एन. बैसाणे, श्री. प्रकाश नागो देसले, श्री. युवराज माळी, श्री. बाळासाहेब गिरासे, श्री. गोविंद मराठे, श्री. बिपीन पाटील, पत्रकार श्री. यादवराव सावंत, प्रशासकीय अधिकारी श्री. परेश देसले हे उपस्थित होते. याप्रसंगी संचालक भैय्यासो. चंद्रशेखर चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गर्ल्स हायस्कूलमध्ये विविध देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर नृत्य, शिस्तबद्ध कवायत, लेझीम नृत्य व पथ संचलनातून संचालक मंडळास मानवंदना देण्यात आली. कु. समृद्धी धनगर व कु. डॉली माळी या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. ए. बी. पाटील सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील, पर्यवेक्षक श्री. के. के. चौधरी, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. किशोर पाटील, आनंद प्रि-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा देसले व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधु भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी. पी राजपूत व श्रीमती जयश्री पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. ए. टी. पाटील यांनी केले.
0 Comments