. ( *दोंडाईचा बातमीदार)* यावर्षी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत दोंडाईचा शहरातील जागृत मतदार नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मनस्थित दिसत आहे. आम्ही दोंडाईचा शहरातील प्रभागात फेरफटका मारला असता .अनेक नगरसेवकांमध्ये जनतेची प्रतिक्रिया नकारात्मक होती .विशेष म्हणजे अनेकांनी नावाचा उलगडा न करता आमच्याकडे म्हटले ,रावल गटाची मागील पाच वर्षाचा काम संदर्भात मतदार बऱ्यापैकी सकारात्मक आहे. परंतु पाच वर्षाच्या सत्ता काळात दोन-चार नगरसेवक वगळता काहींनी प्रभागात पाहिजे तसे लक्ष दिले नाही .म्हणून शहरातील विकास कामांचा भार दोन, चार नगरसेवकावरच राहिला. भाजपाचे आमदार जयकुमार भाऊ यांच्यावर वरिष्ठांची मोठी जबाबदारी असल्याने ते मंत्री काळात दोंडाईचाला फार वेळ देऊ शकले नाही. परंतु कामाबाबत ते फार चोखन्न होते त्यांनी आपली राजकीय वजन वापरू शहराला प्रचंड निधी मिळून दिला. व इतर गावांपेक्षा दोंडाईचा शहराकडे बऱ्यापैकी लक्ष दिले. यात मात्र शंका नाही परंतु मागील पाच वर्षाचा सत्ता काळात एकही नवीन चेहरा दिसला नाही. नेहमीच पूर्वीचे कार्यकर्ते भाऊंच्या अवतीभवती असतात. नवीन एखादा देखील कार्यकर्ता जुडला नाही याचे काय कारण ?जयकुमार भाऊ दोंडाईचा शहरात आले की सर्व स्थानिक कार्यकर्ते भाऊंच्या अवतीभवती गर्दी करताना दिसतात व सर्व काही आलबेल असल्याचे भासवतात परंतु दिसतं तसं नसतं या म्हणी प्रमाणे परिस्थिती दिसत आहे. मागच्या दोन वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे "आओ जाओ घर तुम्हारा "अशी अवस्था दोंडाईचा नगरपालिकेची झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक यावर्षी होणार काळा दगडावरची रेष असून. अनेक नगरसेवकांना यावेळेस घरचा रस्ता दाखवण्याच्या निर्णय जनतेने घेतल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आमदार जयकुमार रावल यांचा सत्तेच्या काळात अनेक कामे झाली हे तेवढेच सत्य आहे. परंतु जनतेच्या संपर्कात राहणे हे देखील तेवढे महत्त्वाचे आहे. मग कोणाकडे लग्न असो, मरणधरण किंवा काही आर्थिक अडचण या छोट्या मोठ्या गोष्टीकडे जर नेत्यांनी लक्ष दिले तर निवडणुकीत तो फायदा त्यांना जरूर होतो. आणि तिथेच रावल गट कमी पडताना दिसत आहे. आज जरी देशमुखांची बिल्डिंग शांत दिसत असली तरी ऐन वेळेस काहीही करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने रावल गटाला जागृत राहणे गरजेचे आहे.
0 Comments