दोंडाईचा शहरात २०१६ पासून अपर तहसील कार्यालय निर्माण झाले आहे आठ वर्षे पूर्ण होतील परंतु अपर तहसील कार्यालयाला दाखला देण्याचा अधिकार नसल्याने तहसीलदार पद नामधारी आहे का?अशी शंका येते कारण अपर तहसील कार्यालय निर्माण झाले असले तरी महाराष्ट्र रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला असे अनेक प्रकारचे दाखले देण्याचा अधिकार आजही शिंदखेडा तहसीलदारांना आहे. सरकारने गतिमान शासन करण्यासाठी डिजिटल इंडिया अतंर्गत डिजिटल दाखले देण्याची योजना सुरु केली आहे. पुर्वीपासून शिंदखेडा तहसील कार्यालयात सर्व दाखले देण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे कामकाज जास्त असल्यामुळे २०१६ ला नव्याने दोंडाईचा अपर तहसील कार्यालय निर्माण झाले अपर तहसील कार्यालय निर्माण झाले असले तरी दाखला देण्याचे कामकाज वाटप झाले नाही कारण तालुक्याची लाॅंगिन एकच ठेवली आहे. त्यामुळे दाखला देण्याचा अधिकार अपर तहसीलदारांना मिळाला नाही. शासनाचे कामकाज सुलभ होण्यासाठी बाहेरील ई -सेवा सेतू केंद्रातून आॅनलाईन माहिती भरता येते त्यानूसार आॅनलाईन दाखला मिळतो. परंतु तो अधिकार अपर तहसीलदारांना मिळाला नाही. म्हणून महाराष्ट्र रहिवासी दाखला असो का?उत्पन्न दाखला असो अनेक प्रकारचे दाखले आजही शिंदखेडा तहसीलदार यांच्या लाॅंगिन ने मिळतात त्यांचा थम लागल्याशिवाय दाखला मिळत नाही. दोंडाईचा अपर तहसील कार्यालय निर्माण होऊन आठ वर्षे झाले तरी लाॅंगिन वेगवेगळे करता आले नाही लाॅंगिन मशीन जवळपास तीन हजार रुपयापर्यंत असेल नवीन मशीन घेऊन लाॅंगिन करुन जलदगती ने दाखले देता येतील. सध्या बाहेरील ई महासेवा सेतू केंद्रातून आॅनलाईन फार्म भरण्याची सुविधा आहे. दहावी, बारावी शाळेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले लागतात तेव्हा शिंदखेडा तहसील कार्यालयात दाखले मागणीसाठी जास्त गर्दी होते आॅनलाईन असुन दाखले पंधरा ते वीस दिवस मिळत नाही तेव्हा विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात कधीकधी नुकसानही होते अपर तहसील कार्यालय आहे परंतु दाखले देण्याची सुविधा नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने लाॅंगिन मशीन उपलब्ध करुन दिल्यास स्थानिक अपर तहसील कार्यालयात दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळतात....
अहिल्या न्यूज मिडिया*साभार
0 Comments