✍️ दोंडाईचा प्रतिनिधी*- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिंदखेडा तालुक्यातील विखरण ग्रामपंचायत तर्फे प्रथम लोकनियुक्त सरपंच अनिता महेंद्र पवार, उपसरपंच वंदना उमेश पाटील यांच्या हस्ते शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रा प सदस्य नारायण भिल, जगदीश पाटील, प्रा प्रदीप साळुंके, शरद पाटील, विनोद गिरासे, हरीश पाटील, रामसिंग बापू, गट नेते शिवाजी सदा पाटील, विक्रम अण्णा तायडे, रामसिंग गिरासे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी विखरण ग्रामपंचायतच्या या कामाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र पवार व उमेश पाटील यांनी केले
0 Comments