Header Ads Widget

*प्रताप रॉयल स्कूल येथे डॉ. मंडाले यांच्या हस्ते ध्वजारोहण*



                                                                दोंडाईचा प्रतिनिधी*- दोंडाईचा येथील प्रताप रॉयल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. अनिकेत मंडाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी  सुनील पुरसवाणी, सौ. प्रेरणा सोलंकी हे उपस्थित होते. यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा हमला हा ड्रामा प्रस्तुत करून सगळ्या उपस्थितांचे लक्ष वेधले. शाळेच्या चेअरमन सौ. चंद्रकला सिसोदिया यांनी आभार व्यक्त केले. शाळेचे प्रिन्सिपल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन निमा मॅडम व ललित सर यांनी केले.
*साप्ता. तापी मैदान✍️ साभार 

Post a Comment

0 Comments