दोंडाईचा -- अयोध्यातील श्रीराम मंदिरात दि २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम ऐतिहासिक सोहाळा संपूर्ण भारत देशात व गांवा गांवातुन खेड्या खेड्यातुन अतिशय उत्साहात संपन्न झाला ५५० वर्षाच्या प्रदिर्ध प्रतिक्षेत आज अयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे निर्माण झाले असुन अश्या या पावन श्रीरामाच्या आगमनात उत्साहात सहभागी झालेल्या दोंडाईचा येथील नामांकित जे.के.सुपरमार्केट किराणा दुकानाचे संचालक श्री सुमित पारख यांच्या धर्मपत्नी नेहमी दोंडाईचा शहरात सोशल वर्कच्या माध्यमातून अनेक नवनवीन कार्यक्रम आयोजित करत असलेल्या इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा असुन दै.लोकमत या वर्तमानपत्राचे सखी मंच मध्ये दोंडाईचा शहरात महिलाची नोंदणीची त्यांनी सुरूवात केली अश्या सौ मयुरा सुमीत पारख यांनी जुगनु चौक परिसरात मयुरा ॲण्ड पटेल केक शाॅपी या नवीन सुरू केलेल्या शोरूम केक शाॅपीत त्यांनी श्री प्रभु राम यांचे जवळ जवळ १५ किलो वजनाच्या चाॅकलेट चे मंदिर अतिशय सुंदर असे बनवले असुन याला बनवण्यास त्यांना ४५ तास लागले असुन तसेच श्रीरामाच्या रथ सुद्धा अतिशय सुंदर मोहक बनवला असुन त्यांचे वजन ४ किलो असुन याला बनवण्यास सुद्धा ३० तासाच्या अवधी लागला असुन अश्या या सर्व दोंडाईचा कर नागरिकांना सुंदर अश्या मोहक चाॅकलेट पासुन बनवलेल्या श्रीराम मंदिराच्या देखावा पाहण्यासाठी सर्वाना आमंत्रित केले होते त्यांच्या या सुंदर अश्या चाकलेट पासुन बनवलेले श्री राम मंदिर व रथाच्या अनेक नागरिकांनी त्यांचे या नाविन्यपूर्ण देखावा पाहण्यासाठी भेट दिली असुन सौ मयुरा पारख यांचे कौतुक केले. मागे सुद्धा गणेशोत्सव काळात त्यांनी चाकलेट पासुन गणपती बाप्पाची स्थापना केली होती व त्या मुर्तीची विसर्जन दुधात करून त्यांनी ते दुध आश्रमशाळेत जाऊन त्यांनी मुलांना त्यांचा प्रसाद म्हणून दिला होता.आता सुद्धा या चाकलेट पासुन बनवलेली श्रीराम रथाची कलाकृती यांचे सुद्धा असेच विसर्जन करण्यात येईल परंतु दोंडाईचा कर नागरिकांची ईच्छा आहे की थोडे दिवस नागरीकांना पाहण्यासाठी राहु द्यावे म्हणून नागरिकाच्या आग्रहास्तव श्री प्रभु रामाची चाकलेट पासुन बनवलेली सुंदर अशी कलाकृती सर्वांनी एकदा स्टेशन भागातील जुगनु चौक परिसरातील मयुरा ॲण्ड पटेल केक शाॅपीला भेट देऊन पहावे असे सौ मयुरा पारख यांनी सांगितले श्री पांडुरंग शिंपी दोंडाईचा सहसंपादक साप्ताहिक विध्यहर्ता समाचार.*
0 Comments