Header Ads Widget

*जेष्ठ नागरिक संघातर्फे दंत तपासणी शिबिरात शिबिर- 60 जणांनी केली तपासणी*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- येथिल ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संघाच्या  कार्यालयात दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 60 जणांनी तपासणी केली. सदर शिबिराचे उद्घाटन सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य एड. वसंतराव भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील होते .या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ.एन.पी.पाटिल,सचिव प्रा.चंद्रकांत डागा, वाचनालये अध्यक्ष अशोक राखेचा, उपाध्यक्ष प्रवीण पारख, सचिव कोतीक पाटिल,प्रा.सुरेश देसले, मा.नगरसेवक सुनिल चौधरी,संचालक एड.नामदेव मराठे, रंगराव पाटिल, उद्धवसिंग गिरसे, इबराहिम पठाण, संतोष बडगुजर, दयाराम माळी, जितेन्द्र मेखे,शेख जलाल आदी उपस्थित होते.
डॉ. सुजाता रखेचा व डॉ. प्रितेश बोथरा यांच्या मार्फत दातांची तपासणी करण्यात आली.
लहान मुलांना दातांच्या चांगल्या आरोग्याचे सवय लावा, चॉकलेट खाल्ल्यानंतर दात साफ करायला सांगा, दिवसातून दोन वेळा ब्रश करा ,आपल्या मौल्यवान दातांची काळजी घ्या, दातांची समस्या असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच दातांची घ्यावयचायो काळजी या बद्दल दोघं डॉक्टरांनी यावेळी  मार्गदर्शन केले.सुत्र संचालन प्रा. डागा व आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. 

Post a Comment

0 Comments