Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील सरकार साहेब विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*




    शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - तालुक्यातील बाम्हणे येथील सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या


 अध्यक्षस्थानी सौ कुसुमताई दिगंबर निकम, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनी भूषविले.त्यांनी स्नेहसंमेलनाचे नटराज व सरस्वती पूजन करत दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब कामराज निकम , सौ. सुंदरबाई सुरेश भिल सरपंच बाम्हणे, श्री नवल रामदास पाटील, श्री महेंद्र बापूराव निकम, श्री भगवान देविदास निकम, श्री देवानंद कृष्णराव बोरसे  श्री वैभव दिगंबर निकम, सौ.मनीषा दीपक बागले, श्री देवेंद्र सुखदेव रगडे, श्री विलास जिजाबराव निकम, श्री.कुणाल नरहर  निकम श्री भरत सुभाष निकम, श्री भीमराव गैधल बागले, श्री शिवाजी भिका निकम, श्री नाटेश्वर दयाराम निकम, श्री गणेश केशव पाटील, श्री दीपक बिऱ्हाडे, श्री महेंद्र रमेश शिसोदे, श्री सत्तरसिंग जामसिंग गिरासे, श्री जिजाबराव निंबा पाटील, श्री देविदास शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
 या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आमदार जयकुमार भाऊ रावल,माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, भाऊसाहेब सी एन राजपूत, सेक्रेटरी स्वोद्धारक विद्यार्थी संस्था, भाऊसाहेब  ललितसिंह गिरासे, अकॅडमीक सेक्रेटरी स्वोद्धारक  विद्यार्थी संस्था यांनी अभिनंदन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र चित्ते सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री बी एस निकम, आर ए चित्ते, एस एस निकम, बी पी गिरासे, ए. डी.माळी, श्रीमती जे.पी. सिसोदे, श्री अतुल बोरसे, श्री देवरे सर,श्री डी. व्ही.बागल, श्री डी बी पाटील, श्री दिग्विजय रावल, श्री डी आर वाघ, श्री रवींद्र गिरासे त्यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलन उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या प्रेरणेने तर माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असताना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात. स्नेहसंमेलनात सदाबहार लावणी , आदिवासी नृत्य , पाडणा , फनी डान्स , पर्यावरण गीत , राम आयेंगे.. भावना गीत आदि कलाविष्कार, सदाबहार गित.,नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. स्नेहसंमेलन यशस्वितेसाठी मुख्याध्यापक भुपेंद्र निकम , कामराज निकम सह शिक्षक , शिक्षीका ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बाम्हणे सह कोडदे ,लंघाणे आदि परिसरातील पालक ,विद्यार्थी, प्रेक्षक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments