शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - गणेश हायस्कूल शेवाडे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .शाळेचे स्थानिक चेअरमन श्री .अजबसिंग नवलसिंग गिरासे यांनी ध्वजारोहण केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए.के. अमृतसागर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना पर भाषणे सादर केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यात देशभक्तीपर गीते ग्रुप डान्स नाटिका इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शेवाडे स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य मंडळ, ग्रामपंचायत मंडळ, जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा नवेगाव. सर्व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी .एन. पाटील सर व चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री एस एम देशमुख, तसेच एस. पी .पाटील सर, शेलार सर, सोनजे सर,धनगवाल सर, मराठे सर ,बोरसे सर ,जगताप सर, मराठे मॅडम ,शेवाळे सर, इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments