शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी : शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलीत एस. एम. एफ. एस. गर्ल्स हायस्कूल, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर व आनंद प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूलचे ʻ जल्लोष २०२४ ʼ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. सुरूवातीला संस्थेच्या पदाधिकारी व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. हसनभाई शम्शी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबासो. श्री. स्वप्नील देसले, सचिव नानासो. श्री. आनंदा चौधरी, ज्येष्ठ संचालक आबासो. श्री. आधार पाटील, माजी प्राचार्य श्री. प्रदीप दीक्षित, बाबासो. श्री. एम.वाय. पवार, दादासो. श्री. दीपक देसले, ज्येष्ठ संचालिका श्रीमती शैलाताई देसले व प्रमुख पाहुणे म्हणून ग. शि. सो. डॉ. सी. के. पाटील, केंद्रप्रमुख, श्री. सी. जी. बोरसे, एस. एस. व्ही. पी. एस कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील, एम. एच. एस. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. टी. एन. पाटील, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. के. बी. अहिरराव, नाशिक विभागाच्या कृषि उपसंचालक कु. हर्षदा देसले, श्री. दयाराम माळी, नगरसेवक श्री. उदय देसले, श्री. उल्हास देशमुख, सौ. योगीता पाटील, शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री. परेश देसले, माजी प्राचार्य श्री. एस. डी. गुजराथी, माजी मुख्याध्यापिका सौ. एस. डी. ठाकूर, माजी कला शिक्षिका सौ. एल. एन. बैसाणे, पत्रकार श्री. यादवराव सावंत, श्री. जितेंद्र मेखे, श्री. अशोक गिरणार, श्री. प्रकाश देसले, श्री. एस. टी. चौधरी, श्री. बी. एल. सोनवणे, श्री. गोविंद मराठे व पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या मार्फत सत्कार करण्यात आले. गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. पी. पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख सी. एस. पाटील, यांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. ʻ टीचर ऑफ द इयर ʼ या पुरस्काराने कला शिक्षक ए. यु. मराठे तर ʻ स्टुडन्ट ऑफ द इयर ʼ या पुरस्काराने कु. अस्मिता जितेंद्र देसले, तर कु. समृद्धी धनगर या विद्यार्थिनीचा नाट्यस्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थिनी कृषी उपसंचालक कु. हर्षदा संजय देसले यांचा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थिनी प्रा. कु. योगेश्वरी सावंत यांचा सत्कार ग. शि. सो. डॉ. सी. के. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. तालुका स्तरावर कबड्डी, लांब उडी या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा पदक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक के. के. चौधरी, ए. यु. मराठे, एस. टी. चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाबाबत डॉ. तुषार पाटील, ग. शि. डॉ. सी. के. पाटील, मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्नेहसंमेलनात एकूण ४० कार्यक्रम सादर करण्यात आले. ʻ मेरे घर राम आये है , जमाल कुडू, कोंबडी पळाली, आदिवासी नृत्य, सोन्याचा झुमका, नऊवारी साडी, उधळ उधळ, शिवतांडव स्तोत्र, गुलाबी शरारा, मै निकला वो गड्डी लेके, मेरी झोपडी के भाग आज खुलल जायेंगे, गाडीवाला आया घरसे कचरा निकाल, छबीदार छबी, लल्लाटी भंडार, मखना, अंबाबाई गोंधळाला ये, कानबाई गीत, बाईपण भारी देवा, मन मस्त मगन, भगवाधारी, स्वीटी तेरा ड्रामा, डान्स विथ ड्रामा ʼ ही रिमिक्स गीते तर महाभारताच्या ʻ यदा यदा ही धर्मस्य ʼ गीतावर आधारीत व ʻ सोशल मिडीया की गुलामी ʼ या नाटिका सादर करण्यात आल्या. आनंद प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूल व आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, गर्ल्स हायस्कूलच्या सर्वच विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. किशोर पाटील, आनंद प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा देसले, सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर बंधु उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून शालेय शिस्त सांभाळण्याचे काम १०वीच्या विद्यार्थिनींनी केले. मान्यवरांचे स्वागत श्री. ए. बी. वारूडे, श्री. ए. बी. पाटील, श्रीमती एस. जे. कुलकर्णी, सौ. ए. टी. पाटील यांनी केले. तांत्रिक सहकार्य श्री. एन. डी. सोनार, श्री. टी. डी. बावीस्कर यांनी केले. विद्यार्थिनींच्या कलागुणांना दाद देत पालकांनी दिलेल्या बक्षिसांची यादी तयार करण्याचे काम श्री. के. एस. परदेशी, श्री. पी. एम. गुजराथी, श्री, ए. यु. मराठे यांनी केले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्री. व्ही. आर. महाले, श्रीमती एम. जी. पाटील, श्री. डी. बी. जगताप, व सौ. पी. पी. राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती आरती चौधरी यांनी केले.
0 Comments