दोंडाईचा शहर हे दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा बाबतीत जिल्ह्यातचं नाही तर महाराष्ट्रात अव्वल ठरतं आहे. काही वर्षांपूर्वी हे धंदे चोरून लपून सुरु होते आतातर यांना लोकप्रतिनिधी व दोंडाईचा पोलिस स्टेशनचा आशीर्वादाने भरवस्तीत अवैध धंदे करण्याची एन.ओ.सी. मिळाली आहे. प्रभारी नुतन पोलिस निरीक्षक मा. शिरसाठ साहेब कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य दोंडाईच्यातील जनता करत होती पण त्यांचीही अपेक्षा भंग झाली. रात्री पार्टी करायला मालपुर जायायला तुम्हाला वेळ आहे. पण या अवैध व्यवसाय करत असलेले माफिया विरोधात कार्यवाही करायला वेळ नाही. हास्यास्पद अरे कशाला शपथ घेता " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. बदल करा त्याच्यात महाराष्ट्र पोलीस भ्रष्टाचारांचे रक्षण करण्यास आणि जे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी यांचा आदर करण्यास कटिबद्ध आहेत. लाज वाटली पाहिजे डॉ. बाबासाहेब चौक येथे जुगार अड्ड्यावर मद्य प्राशन करून तुम्ही भर वस्तीत चाललेल्या जुगार माफियांचे समर्थन करून दलित बांधवांचा दम देतात..ते अहिल्याबाई शॉपिंग येथे चाललेल्या जुगार माफिया यांच्या मुळे इनामदारीने चालवलेल्या व्यवसायांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता ही गोष्ट दोंडाईचेतील सर्व सामान्य नागरिकांनी समजून घेयायला हवी की आपण दोन हजार रुपयाने आपले मत विकून कोणाला मतदान करत आहोत. दोंडाईचा करांनो येणाऱ्या काळात तुमच्या घराजवळ असे अवैध व्यवसाय, व्यश्या व्यवसाय सुरू केला जाईल आणि तुम्ही लाचार होऊन काहीही करू शकत नाही. वेळीच सावध व्हा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे महत्व व अधिकार जाणून घ्या नाहीतर हे अहंकारी राजकारणी तुम्हाला गुलाम करण्यात कोणतीही काटकसर करणार नाही. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments