Header Ads Widget

*धुळे शहर पोलिस स्टेशनची विभागणी करुन मिल परिसर साठी स्वतंत्र पोलिस स्टेशन द्यावे:- ऍड.पंकज गोरे*🔥🚩🐅🔱🕉️





🚩   *गेल्या काही वर्षांपासून धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे वाढती लोकसंख्या यासोबतच नागरिकांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे हे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापकता येणे अत्यंत गरजेचे आहे, शहराची लोकसंख्या ही ७ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे विविध समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आपल्या समस्यांबाबत न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, मात्र काही वेळा प्रशासकीय यंत्रणेच्या कमतरतेमुळे नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही, तसेच समस्या देखील सुटत नाही.*
✍🏻    *विविध प्रश्नांसोबत वाढती गुन्हेगारी ही देखील चिंतेची बाब बनली असून वाढत्या लोकसंख्येमूळे पोलिस प्रशासनावर देखील अतिरिक्त ताण पडत आहे. धुळे शहरात सुरवातीला चार पोलिस स्टेशन होती. या मध्ये आझादनगर पोलिस स्टेशन व देवपूर पोलिस स्टेशन यांची विभागणी होऊन आझादनगर पोलिस स्टेशन चे दोन भाग होऊन त्यात चालीस गाव रोड पोलिस स्टेशन झाले तर देवपूर पोलिस स्टेशनचे दोन भाग होऊन पचिम देवपूर पोलिस स्टेशन निर्माण करण्यात आले असे एकुन चार चे सहा पोलिस स्टेशन झाली याच धरती वर धुळे शहर पोलिस स्टेशनची विभागणी करुन मिल परिसर भागात एक स्वतंन्र पोलिस स्टेशन देण्यात यावे.
👉🏻   *धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास अडीच लाख नागरिक असून शहरातील अत्यंत महत्वाचे असणारे ठिकाण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. यात जुना आग्रा रोड, सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड, मिल परिसर, चितोड मधील कॉलनी परिसर, गुरूद्वारा परिसर, रेल्वे क्रॉसिंग, दसरा मैदान, मालेगाव रोड, बारा पत्थर, स्टेशन रोड, अश्या अत्यंत महत्वाच्या भागांचा समावेश होतो. तसेच प्रशासकीय कार्यालये, जिल्हा न्यायालय, बस स्टँड, शाळा आणि काही महाविद्यालय देखील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. तसेच शहरात होणारे विविध कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलने यामुळे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी कायम व्यस्त असतात तसेच या कामांचा अतिरिक्त ताण देखील त्यांच्यावर असतो.*
👉🏻   *शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिल परिसर देखील येतो, याठिकाणी सतत लहान मोठे वाद किंवा काही अप्रिय घटना घडत असतात, तसेच या भागातील नागरिकांना पोलिसांशी संबंधित असणाऱ्या कामांसाठी सतत शहर पोलीस ठाण्यात यावे लागते. या भागातील काही भाग शहर पोलिस स्टेशन पासून ८ ते १० किलोमीटर दूर आहेत. नागरिकांना शहर पोलीस ठाण्यात येण्यासाठी किमान ८ ते १० किलोमीटर अंतर यावे लागते, यामुळे वेळेचा अपव्यय होऊन तसेच जास्त अंतर असल्या कारणाने पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहचू शकत नाही, या भागात पोलीस प्रशासनाचे लक्ष असावे ज्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच मिल परिसराकडून सुरत-नागपूर महामार्गाकडे जाण्यासाठी अत्यंत सोपा रस्ता असल्याने याभागात चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. घटना घडल्यावर तात्काळ पोलिसांची मदत मिळाल्यास या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, यापार्श्वभूमीवर मिल परिसर भागात स्वतंत्र शहर पोलीस स्टेशन असणे खूप गरजेचे झाले आहे. धुळे शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणारी स्वतंत्र पोलीस स्टेशन मिल परिसर भागात उभारण्यात यावे, यासाठी लागणारी शासनाची जागा देखील उपलब्ध करून देण्यात यावी. या संदर्भात मिल परिसर भागातील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय भगवा चौक येथे येऊन मागणी देखील केली आहे.*
✍🏻    *धुळेकर बांधवांच्या सुरक्षतेबाबत महत्त्वाचा प्रश्न असून यासाठी आपणाकडे मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. या प्रसंगी उपस्थित शिवसेना संपर्कप्रमुख अशोकजी धात्रकसाहेब, विस्तारक तथा महाराष्ट्र सहसचिव ऍड.पंकज गोरे, निलेश चौधरी, संकेत पाचपुते,गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत, सोनू मुर्तडक, आशू भडागे, जयवंत गोरे, पवन खांडरे उपस्थित होते.*


#hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #ShivsenaUBT #UddhavThackeray #aadityathackeray #AdvPankajGore #assembly #धुळेकर #PGFoundation #PG #dhulekar


🔥 *शिवसैनिक ऍड.पंकज गोरे*
🐅 *युवासेना विस्तारक तथा महाराष्ट्र राज्य सहसचिव*
🚩 *श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास मा.ट्रस्टी प्रभादेवी दादर मुंबई(महाराष्ट्र शासन नियंत्रित)*
🔱 *PG फाऊंडेशन संस्थापक*

Post a Comment

0 Comments