Header Ads Widget

*उज्वल शैक्षणिक संकुल-स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - येथील उज्वल शैक्षणिक संकुलात श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर, निवासी मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉ.आर.आर.पाटील होते. कार्यक्रमाचे  उद्घाटन शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते रावसाहेब  अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस वर्षभरात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विविध क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांना पालकांसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सांस्कृतिक  कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य,नाटिका,गायन अशी ४९ कार्यक्रम सादर सादर करण्यात आले त्यातून ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती,युवा शक्ती, नारीशक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, अशा विविध विषयांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले यातून  उपस्थितांची  मने जिंकली सध्याच्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे मुलांकडे दुर्लक्ष आणि त्यातून होणारे दुष्परिणाम यावर आधारित सोशल मीडिया या नाटिकेतून सादर करण्यात आले आणि मी सरपंच बोलतेय..बायका झाले सरपंच या त्रिवेणी माळी या विद्यार्थिनीने महिलाही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे आपल्या एकपात्री अभिनयातून सादर केले आणि  उपस्थितांची दाद मिळवली. नाच रे मोरा या गाण्यावर लहान चिमुकल्यांनी सादर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के.पाटील, केंद्रप्रमुख श्री सी.जी. बोरसे,नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री सचिन वाघ, भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री संजयजी शर्मा,धुळे, डॉ.श्री रवींद्र देसले,संस्थापक अध्यक्ष बिजासनी पतसंस्था,माजी उपनगराध्यक्ष श्री प्रकाश देसले,  माजी नगराध्यक्ष श्री दीपक देसले,माजी उपनगराध्यक्ष श्री उल्हास देशमुख,
माजी उपनगराध्यक्ष श्री भिला पाटील, वि.का.सोसायटीचे चेअरमन श्री युवराज माळी, माजी पंचायत समिती सदस्य श्री सुभाष माळी,माजी नगरसेवक श्री चेतन परमार, ॲड. श्री विनोद पाटील,श्री उदय देसले,चिलाणे गावाचे सरपंच श्री.जितेंद्र सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील बोरसे रंजाणे ,श्री सुनील शिंदे माजी सरपंच बाभुळदे,पत्रकार प्रा.श्री.प्रदीप दीक्षित,श्री अशोक गिरनार,श्री यादवराव सावंत, नृत्य मार्गदर्शक श्री किशोर वर्मा धुळे, महिला व पुरुष पालक,श्री हिरालाल जाधव संस्थेचे सचिव  इंजि. उज्वल आर.पाटील, संचालक दादासाहेब श्री.अनिल पाटील, संचालिका सौ अनिता रमेश पाटील, प्राचार्य एम.डी. पाटील, मुख्याध्यापक श्री एस.आर. पाटील, प्र. मुख्याध्यापिका श्रीमती ए.के माळी,माजीं विदयार्थी,विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments