शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील नगरपंचायत शिंदखेडा हद्दीतील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या- रज्जाक नगर नदीपार भिलाटी २) भुमापक क्रं. १२१५ (बंगला भिलाटी) मा. मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांनी भुमापक भूमिअभिलेख कडे जमा भरलेली आहे.जमा भरुन जवळपास दोन वर्षाहुन अधिक काळ लोटला तरी तालुका भूमी अभिलेख उप अधीक्षक यांनी मोजमाप केलेली नाही. नगरपंचायतीच्या पत्रांकडे दुर्लक्ष केलेले आहे. आम्ही देरवील आदिवासी काँग्रेस सेल व भिल समाज विकास मंचच्या माध्यमातून भूमी अभिलेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केलेला आहे, करीत आहोत. तरीही संबंधित कार्यालय आदिवासींचे अतिक्रमण नियमाकुल करीत नसल्याने घरकुलाचा लाभ मिळत नाही तरी आपणास नम्र निवदेनांद्वारे सदरील तालुका भूमि अभिलेख कार्यालयास आपल्या स्तरावर आदेशीत करून शिंदखेडा जि. धुळे येथील नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत येणाऱ्या रज्जाक नगर नदीपार गट 2 व भिलाटी व भुमापक क्र. १२१५ बंगला भिलाटीआणि 362 गट शबरहाटी भिलाटी जनता नगर येथील रहिवाशी आदिवासींना अतिक्रमण नियमाकुल करून मिळवून दयावा. श्री. दिपक दशरथ अहिरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेल, संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच म्हणून सुचित करित असुन सदरील विषय मार्गी लावावेत हयासाठी हे निवेदन अवलोकन करण्यासाठी दिलेले असुन वारंवार तक्रार व निवेदन देवुन ही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने *पाच फेब्रुवारी* पासून शिंदखेडा तहसिल कार्यालय समोर शहर व तालुक्यातील आदिवासी समाज महिला बांधवांसह अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा देत असुन हयाप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास भुमि अभिलेख विभागाचे अधिकारी व नगरपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहतील असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसिलदार, नगरपंचायत यांना देण्यात आले. हयाप्रसंगी दिपक दशरथ अहिरे , अशोक सोनवणे, राजेश मालचे, हामिद पठाण, अजय मराठे, राहुल पाटोळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments