Header Ads Widget

*भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा मच्छिमार (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मन्साराम भोये यांची केली नियुक्ती*




    धुळे : भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा मच्छिमार (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मन्साराम काळु भोये रा. नवेनगर ता. साक्री जि. धुळे यांची नियुक्ती केली आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, केंद्रीय माजीमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते नुकतेच भाजपा मच्छिमार (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मन्साराम भोये यांना धुळे येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, धुळे ग्रामिण भारतीय जनता पार्टीच्या मच्छिमार (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मी आपली नियुक्ती करीत आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासुन विविध क्षेत्रात काम करीत आहात. त्याची दखल घेवून आपली ही नियुक्ती करण्यात येत आहे. आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. संभाजीराव पगारे, शिक्षण संस्था आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बच्छाव, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, सौ. लिलाबाई सुर्यवंशी, साक्री विधानसभा प्रमुख मोहन सुर्यवंशी, साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी आदि उपस्थित होते. धुळे ग्रामिण भारतीय जनता पार्टीच्या मच्छिमार (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मन्साराम भोये यांची नियुक्ती झाल्याबद्दल आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित, माजीमंत्री आ. जयकुमार रावळ, माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, माजीमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिनाताई गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, आ. काशिराम पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा प्रभारी स्मिताताई वाघ आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments