Header Ads Widget

शिंदखेडा येथील एटीएम सेंटर फोडलं, नऊ लाखाची रोकड लांबवली


धुळे- शिंदखेडा शहरातील बस स्थानकाजवळील एटीएम मशीन फोडून सुमारे नऊ लाख रुपये चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा प्रकार कैद झाला असून चौघा चोरट्यांनी चोरीसाठी कारचा वापर केल्याची बाब देखील निदर्शनास आली आहे.

ही चोरी पर राज्यातील चोरट्यांनी केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान रखवालदार नसल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम सेंटर फोडले गेले आहे.

शिंदखेडा शहरातील बस स्थानकाजवळील एका चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरचे मशीनची तोडफोड झाल्याचा प्रकार आज निदर्शनास आला. ही माहिती कळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. या एटीएम सेंटरमध्ये कोणताही रखवालदार ठेवलेला नसल्यामुळे चोरट्यांनी मशीन फोडून नऊ लाखाची रोकड चोरून नेली. एटीएम सेंटर जवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा प्रकार चौघा चोरट्यांनी केला असून त्यासाठी एका कारचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून आले असून आता पोलीस पथकाने या कारचा शोध सुरू केला आहे. दरम्यान शहानपथकाने देखील एटीएम सेंटर पासून जवळ चौकापर्यंतचा मार्ग दाखवण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा चोरीचा प्रकार पर राज्यातील चोरट्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस आता या चोरट्यांच्या मागावर आहेत.

Post a Comment

0 Comments