Header Ads Widget

*धुळे शहर रेल्वेच्या प्रमुख मार्गावर येण्याचा मार्ग मोकळा!*



*धुळे* नाशिक , जळगाव , नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांसाठी आनंदाची बातमी काल मिळाली. खान्देशातील जनतेची गेल्या शतकभरातील मागणी होती. मनमाड - धुळे - इंदोर रेल्वेमार्ग झाला पाहिजे. धुळे मालेगाव शिरपूर  सारख्या मोठ्या शहरांना सरळ रेल्वेचा ॲक्सेस नव्हता. या मार्गासाठी बरीच आंदोलने झाली परंतु न्यू दिल्लीच्या रेल भवनात या प्रस्तावित मागणीची साधी नस्तीही नव्हती. खासदार डॉ. सुभाष भामरे प्रथमतः खासदार व सरंक्षण राज्यमंत्री झाल्यावर या मार्गाचा  प्रथम कागद रेल्वे मंत्रालयात फाईल ला लागला. त्यानंतर  पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी - ना.सुरेश प्रभू . ना. नितीन गडकरी - ना. अश्विनी वैष्णव आदींचे योगदान सर्वश्रृत आहे. जहाज मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण मनमाड - धुळे - इंदोर या मंजूर कामास  नासंमती केली व काम रखडते की काय?  अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग स्वनिधीतून टप्प्या टप्प्याने करावयाचे ठरविले. खुद्द पंतप्रधान ना. नरेंद्र मोदींनी यातील पहिला टप्पा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मंजूर केला. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेला जोडणारा बोरविहीर - धुळे - नरडाणा या टप्प्याचे काम  प्रथम करण्याचे ठरले. खुद्द पंतप्रधानांनी या प्रथम टप्प्याचे भुमीपुजन केले. शिवाय स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिली. त्यामुळे या कामासाठी निधी मिळण्यात अडचणी येवू शकल्या नाहीत. या मार्गाचे सर्व्हेक्षण झाले. भुसंपादन प्रक्रिया झाली. भुसंपादनासाठी १२० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ७० टक्के निधी वाटपही झाला आहे. धुळे - शिंदखेडा तालुक्यातील २६ गावात हे भुसंपादन आहे. आता ९० टक्के भुसंपादन झाल्यावर प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात होणार आहे. त्यासाठी २१ जानेवारी २०२४ रोजी निविदा उघडण्यात आल्या. जोधपुरच्या एच जी इन्फो इंजिनिअरिंग लि. या कंपनीची ७१६ कोटींची निविदा मंजुरही झाली. ३६ महिन्यात त्यांना हे काम पूर्ण करावयाचे आहे. प्रत्यक्ष रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामाची निविदा मंजूर होणे ही मोठी बाब आहे. त्यामुळे हा प्रथम टप्पा लवकरच पूर्ण होईल व धुळे शहर हे रेल्वेच्या प्रमुख मार्गावर येईल ही समाधानाची बाब आहे .

(*योगेंद्र जुनागडे,* धुळे )


Post a Comment

0 Comments